समाज प्रबोधन शिबिर उत्साहात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:14+5:302021-02-26T04:42:14+5:30

या प्रसंगी मार्गदर्शन करताना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव डी.एस.मेश्राम यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरीता तयार केलेले कृषी कायदे ...

Samaj Prabodhan Shibir Utsahat () | समाज प्रबोधन शिबिर उत्साहात ()

समाज प्रबोधन शिबिर उत्साहात ()

Next

या प्रसंगी मार्गदर्शन करताना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे प्रदेश सचिव डी.एस.मेश्राम यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरीता तयार केलेले कृषी कायदे धोकादायक असून हे कायदे त्वरित रद्द करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला योग्य हमीभाव देणारा कायदा तयार करावा. पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे महागाई भयंकर वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकावर व त्यांच्या व्यवसायावर पडत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे निर्धारित भाव ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. आदिवासींच्या विविध समस्यांवर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आशिष बोरकर, मनोज उईके, शंतनु भावे, अंकुश वाघाडे, सुनील फुंडे, चैत्राम शहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल बोहरे यांनी केले तर आभार नीलेश चौधरी यांनी मानले.

Web Title: Samaj Prabodhan Shibir Utsahat ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.