राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

By admin | Published: June 22, 2016 01:39 AM2016-06-22T01:39:37+5:302016-06-22T01:39:37+5:30

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’

Samyak Mahaarcha for Rajarshi Shahu Jayanti | राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सम्यक महाचर्चा

Next

गोंदिया : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने ‘ मूलनिवासी आदिवासी वर्ग आपल्या संवैधानिक संधीचा पूर्णत: लाभ घेवू शकला का?’ या विषयावर सम्यक महाचर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमनगर येथे रविवारी पडली.
यात विलास राऊत, मोहसीन खान, सुशीला भालेराव, सविता बेदरकर, लिल्हारे आदींनी सहभाग घेतला. महाचर्चेत सविता बेदरकर म्हणाल्या, १ जानेवारी १८२० मध्ये ५०० महारांनी ३० हजार पेशव्यांना भीमा कोरेगाव (पुणे) येथे युद्धात हरविले नसते तर आज आम्हाला शिक्षण घेण्याचे अधिकार कधीही मिळाले नसते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक नवीन वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जावून महार शूरवीर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत होते. या महार शूरविरांचे महत्त्व समजून बाबासाहेबांनी रक्षा क्षेत्रात महार बटालियनची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मोहसीन खान यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावरील घटनांचे उदाहरण देत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूरचे राजा होते. त्यांच्या दरबारी मनुवादी वर्णव्यवस्थेचा विचारक बावर्ची होता. त्यांनी शाहू महाराजांना आपल्या किचनमध्ये तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून येण्यास मनाई केली. याचा वाईट परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. त्यांनी शतकानुशकते शोषित-पीडित, अधिकारापासून वंचित, वर्णव्यवस्थेमध्ये ज्या जाती अडकलल्या होत्या त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी आपल्या कोल्हापूर संस्थानात सन १९०२ मध्ये आरक्षण लागू केले. त्यामुळे ते भारताचे पहिले आरक्षणाचे जनक बनले. त्यांनी जातीवाद समाप्त करण्यासाठी सन १९१६ मध्ये आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडल्याचे सांगितले.
महाचर्चेत विलास राऊत म्हणाले, मनुवाद्यांनी वर्ण व्यवस्था बनवून शतकानुशकते शोषित-पीडित आदिवासी बहुजनांना गुलाम करण्याचे व त्यांना अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान बनवून आदिवासी-दलित-ओबीसी लोकांना ३४०, ३४१, ३४२ कलमान्वये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार दिले. परंतु आजही शासकवर्ग मनुवादी वर्ण व्यवस्थेत गुंतला असल्याचे सांगितले. यानंतर सुशील भालेराव व लिल्हारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन राजेश बौद्ध यांनी केले. आभार राजेश भोयर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Samyak Mahaarcha for Rajarshi Shahu Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.