२५.१९ कोटींच्या रस्ते बांधकामाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:18 AM2021-07-22T04:18:51+5:302021-07-22T04:18:51+5:30
या अंतर्गत ५५ लाख रुपयांच्या निधीतून इर्री गावातील रस्ते रुंदीकरण, ५० लाख रुपयांच्या निधीतून कटंगी- बरबसपुराच्या दरम्यान रस्ते ...
या अंतर्गत ५५ लाख रुपयांच्या निधीतून इर्री गावातील रस्ते रुंदीकरण, ५० लाख रुपयांच्या निधीतून कटंगी- बरबसपुराच्या दरम्यान रस्ते दुरुस्ती, ५० लाख रुपयांच्या निधीतून धापेवाड़ा येथे रस्ता रुंदीकरण, दीड कोटी रुपयांच्या निधीतून कामठा ते छिपियाच्या दरम्यान रस्ता रुंदीकरण, दीड कोटी रुपयांच्या निधीतून ग्राम कासा जवळ छोट्या पुलाचे बांधकाम, दीड कोटी रुपयांच्या निधीतून पिंडकेपार मंदिर जवळ छोट्या पुलाचे बांधकाम, ५० लाख रुपयांच्या निधीतून मुंडिपार से नवीन पुलापर्यंत रस्ता दुरुस्ती, चार कोटी रुपयांच्या निधीतून अदासी ते गुदमापर्यंत रस्ता रुंदीकरण, दीड कोटी रुपयांच्या निधीतून हिवरा ते तिरोडा रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण, ६० लाख रुपयांच्या निधीतून काटी ते तेड़वाच्या दरम्यान रस्ता दुरुस्ती, पाच कोटींच्या निधीतून तिरोडा रोड ते चुटियापर्यंत रस्ता रुंदीकरण, चार कोटी रुपयांच्या निधीतून सोनपुरी ते देवरीच्या दरम्यान रस्ता रुंदीकरण, ३५ लाख रुपयांच्या निधीतून वड़ेगाव पूल पोचमार्ग निर्मिती, १५६.४५ लाख रुपयांच्या निधीतून दासगाव ते बिरसी मार्गावर छोट्या पुलाचे बांधकाम, तसेच १६३.०८ लाखांच्या निधीतून कोरणी-कारुटोला रस्त्यावर छोट्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे.