पिपरिया घाटावरून रेती उपसा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:39+5:302021-02-27T04:38:39+5:30
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पिपरिया, मांडवी, रेतीघाट आरक्षित ठेवण्यात आले. पण क्षमतेपेक्षा कमी साठा असल्याचे पिपरिया रेती ...
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी पिपरिया, मांडवी, रेतीघाट आरक्षित ठेवण्यात आले. पण क्षमतेपेक्षा कमी साठा असल्याचे पिपरिया रेती घाटावर खदानीत पाणी साचले आहे. धापेवाडा प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने बँक वाॅटर अर्जुनी बोंडरानी घाटापर्यंत येते. त्यामुळे दोन फुट रेतीचा उपसा केल्यानंतर पाणी लागत असल्याने रेतीचा उपसा करता येत नाही. त्यामुळे रेती उपसा बंद झाल्याने घरकुल लाभार्थी पुन्हा अडचणीत आले आहे.
पिपरिया घाटावर रेती संपत असली तरी लागूनच असलेल्या सावराच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मुबलक रेती उपलब्ध आहे. पण रेती भरण्यास तलाठी मनाई करून लाभार्थी व ट्रॅक्टर चालकास समजावून दंडाची व फौजदारी गुन्ह्याची धमकी देत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी रेती कुठून न्यावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे याच अर्जुनी घाटावरच चोरीने रेती व मध्य प्रदेशातून विटा आणण्याची मुभा कुठल्या आधारावर दिली जात आहे हे मात्र समजण्याच्या पलीकडे आहे. दररोज मध्य प्रदेशातून दहा ते वीस ट्रॅक्टर विटा येतात. मात्र रॉयल्टी असूनही घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्यास मनाई केली जात आहे. अर्जुनी क्षेत्रातील लाभार्थ्यांना मांडवी घाट ३५ किमी लांब पडत असून सावरा, अर्जुनी, मुरदाडा घाटावरून रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तसेच याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.