रेतीची वाहतूक करणाऱ्यास ३.५२ लाखांचा दंड ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:52+5:302021-05-29T04:22:52+5:30

गोंदिया : गौण खनिज चोरी करून मोठ्या प्रमाणात मिळकत मिळविणाऱ्या लोकांवर देवरी येथील तहसीलदारांनी अंकुश लावला आहे. मागील ...

Sand transporter fined Rs 3.52 lakh | रेतीची वाहतूक करणाऱ्यास ३.५२ लाखांचा दंड ()

रेतीची वाहतूक करणाऱ्यास ३.५२ लाखांचा दंड ()

Next

गोंदिया : गौण खनिज चोरी करून मोठ्या प्रमाणात मिळकत मिळविणाऱ्या लोकांवर देवरी येथील तहसीलदारांनी अंकुश लावला आहे. मागील आठवडाभरापासून करण्यात आलेल्या बेधडक कारवाईत कोट्यवधीपेक्षा अधिक दंड त्यांनी ठोठावला. यात, शुक्रवारी (दि.२८) त्यांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परला पकडून तीन लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे.

तिरोडा येथील मन्नू लिल्हारे हा देवरी येथे गुरुवारी (दि.२७) मे रोजी सायंकाळी ६ वाजता ६ ब्रास रेती अवैध वाहतूक करीत असताना नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांच्या पथकाने त्याचा ट्रिप्पर क्रमांक एमएच ३५-एजे १९९९ पकडला. त्याच्याकडे ४ ब्रास रेतीची परवाना पावती होती. यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) अन्वये ६ ब्रास रेतीचेच स्वामित्वधन ४०० रुपये व बाजारभाव मूल्य पाच हजार रुपयांप्रमाणे ५ पट दंड एकूण २५ हजार ४०० रुपये, असे एकूण ६ ब्रासचे एक लाख ५२ हजार ४०० व टिप्परचा दंड दोन लाख रुपये असा एकूण तीन लाख ५२ हजार ४०० रुपये दंड आकारला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२८) करण्यात आली आहे.

Web Title: Sand transporter fined Rs 3.52 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.