बिर्री येथील संगीता डोंगरवार ठरली होम मिनिस्टरची मानकरी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:33 AM2021-03-01T04:33:09+5:302021-03-01T04:33:09+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष नीशा तोडासे, तालुका सचिव सुदेक्षणा राऊत, शहर अध्यक्ष रजंना भोई, मार्गदर्शक मीनाक्षी विठ्ठले, रोशन ...

Sangeeta Dongarwar from Birri becomes Home Minister's Honorary () | बिर्री येथील संगीता डोंगरवार ठरली होम मिनिस्टरची मानकरी ()

बिर्री येथील संगीता डोंगरवार ठरली होम मिनिस्टरची मानकरी ()

Next

प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष नीशा तोडासे, तालुका सचिव सुदेक्षणा राऊत, शहर अध्यक्ष रजंना भोई, मार्गदर्शक मीनाक्षी विठ्ठले, रोशन हुकरे उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‌ होम मिनिस्टर उपविजेत्यांमध्ये लीना डोंगरवार, सुनीता माहुलकर, लता डोंगरवार यांचा समावेश आहे. कार्यक्रमाची सुरुवात दार उघड बये दार उघड या गीताने झाली. ‌‌रोशन हुकरे यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात एकाहून एक सरस गेम घेतले. त्यामध्ये फुगे फुगविणे स्पर्धेत संगीता डोंगरवार यांनी बाजी मारली. मी बाई शिकली काउंटिंग गेम स्पर्धेत लता डोंगरवार यांनी बाजी मारली. घर बांधणे स्पर्धेत लीनाताई डोंगरवार तर उंच उडी मारून तोंडात टाचणी पकडून फुगे फोडणे स्पर्धेत सुनीता माहुलकर यांनी बाजी मारली.

चला पुढे स्पर्धेत संगीता डोंगरवार यांनी जिंकून होम मिनिस्टरचा बहुमान पटकावला.

सर्व विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशन शिवनकर यांनी केले. संचालन ममता डोंगरवार यांनी केले तर आभार शहर सचिव ज्योती डोंगरवार यांनी मानले.

Web Title: Sangeeta Dongarwar from Birri becomes Home Minister's Honorary ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.