वडेगाव पंचायतमध्ये स्वच्छता मोहीम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:31 AM2021-09-18T04:31:58+5:302021-09-18T04:31:58+5:30
ही मोहीम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहणार नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने ...
ही मोहीम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहणार नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते. अशीच स्वच्छतेबाबतची क्रांती ग्रामपंचायत वडेगावमध्ये घडत आहे असे दिसत आहे. स्वच्छ वडेगाव अभियानात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छतेच्या कामात सरपंच तुमेश्वरी बघेले, उपसरपंच मीनाक्षी जगने यांनी सहभागी होत स्वच्छता केली व सर्व बचत गटाच्या महिला संघटनाचे कौतुक केले. स्वच्छ भारत मिशन २०२१ अंतर्गत सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छ वडेगाव अभियानात वडेगाव ग्रामवासी दररोज सकाळी श्रमदान करून स्वच्छता करत असतात. शुक्रवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तं.मु.स.अध्यक्ष,स.वन व्यव.समिती अध्यक्ष,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सर्व बचत गटाच्या महिला,सर्व अंगणवाडी सेविका,सर्व आशा सेविका व नागरिक यात सहभागी झाले होते.