गोंदिया शहरासह संपूर्ण गोंदिया विधानसभा क्षेत्राचे होणार सॅनिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:30+5:302021-04-20T04:30:30+5:30
गोंदिया : दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून ...
गोंदिया : दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनावर ताण येत असून, सर्वच खासगी आणि शासकीय दवाखान्यात उपलब्ध असलेली व्यवस्था अपुरी पडत आहे. कोराेनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया शहर व गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सॅनिटायझेशन करण्यासाठी सात हजार लिटर सॅनिटायझर स्व:खर्चातून उपलब्ध करून घेण्यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे.
शासनातर्फे माझे कुटुंब - माझी जवाबदारी मोहीम राबविण्यात आली. त्याच्या परिणामास्तव जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वी आमदार विनोद अग्रवाल यांनी सोशल मीडियामार्फत संदेश प्रसारित केला होता. त्यात त्यांनी शासन निर्णयाचे पालन करणेसंबंधी जनतेला विनंती केली होती. मात्र, वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता तसेच ग्रामीण आणि शहरातील जनतेच्या मागणीनुसार गोंदिया शहरासह संपूर्ण गोंदिया विधानसभेचे सॅनिटायझेशन करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयाने घेतला आहे. शहर आणि गावनिहाय वितरण करण्यात येणार असून, लवकरच सॅनिटायझेशनच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.
......
यापूर्वीसुद्धा करण्यात आले सॅनिटायझेशन
कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेतसुद्धा आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वखर्चाने प्रशासनाला सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते, ज्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम सॅनिटायझेशन पूर्ण झालेली विधानसभा म्हणून गोंदिया विधानसभेचे नाव पुढे आले होते.