ग्रामपंचायत कार्यालयाकडून सॅनिटायझरची फवारणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:23+5:302021-05-15T04:27:23+5:30

गावामध्ये जवळपास १०० च्यावर कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष गायत्री इरले यांच्या आदेशाने ग्रा. पं. कार्यालय ...

Sanitizer spray from Gram Panchayat office () | ग्रामपंचायत कार्यालयाकडून सॅनिटायझरची फवारणी ()

ग्रामपंचायत कार्यालयाकडून सॅनिटायझरची फवारणी ()

Next

गावामध्ये जवळपास १०० च्यावर कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष गायत्री इरले यांच्या आदेशाने ग्रा. पं. कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावण्यात आली. गावामध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करण्याचे इरले यांनी सुचविले.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच त्वरित ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी. ज्यांच्या घरी कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्यांच्या घरच्या मंडळींनी कमीत कमी १४ दिवस घरी राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, अशा सूचना सरपंच इरले यांनी केल्या. यावेळी उपसरपंच सुनील राऊत, तलाठी वाघधरे, ग्रा. पं. सदस्य मीनाक्षी विठ्ठले, सुदेक्षणा राऊत, सुरेखा नंदरधने, दिलीप डोंगरवार, सचिन लोहिया, ओंकार इरले, वर्षा मांडारकर, सुरेखा निंबेकर, अनिता उपरिकर, विवेकानंद राऊत, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य रोशन शिवणकर, नंदकिशोर डोंगरवार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sanitizer spray from Gram Panchayat office ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.