संक्रांतीच्या वाणालाही कोरोना प्रसाराचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:43+5:302021-01-20T04:29:43+5:30
गोंदिया : महिलांच्या पूर्णपणे मोकळीक मिळवून त्यांचा हक्काचा सण म्हणून मकरसंक्रांतीची ओळख आहे. संक्रांती हळदीकुंकूच्या निमित्ताने महिला घराबाहेर तर ...
गोंदिया : महिलांच्या पूर्णपणे मोकळीक मिळवून त्यांचा हक्काचा सण म्हणून मकरसंक्रांतीची ओळख आहे. संक्रांती हळदीकुंकूच्या निमित्ताने महिला घराबाहेर तर पुरुष मंडळी घरात असते. असा हा महिला स्वातंत्र्याचा सण आहे. त्यानुसार, सध्या महिलांच्या हळदीकुंकूचे कार्यक्रम सुरू झाले आहे. मात्र अवघ्या देशाला हेलावून सोडणारा कोरोनाच्या सावटात हे आयोजन होत असल्याने महिलांच्या संक्रांतीच्या वाणालाही कोरोना प्रसाराचा ठपका बसला आहे. अशात महिलांनी कोरोना उपाययोजनांचे पालन करूनच संक्रांत साजरी करणे गरजेचे आहे.
अवघ्या जगाला हेलावून सोडणाऱ्या कोरोनावर देशात लस आली असून, लसीकरणाला सुरुवात झाली आहे. असे असतानाच मात्र लस लागली म्हणून कोरोना संपणार असे नसून कोरोनासोबत आणखी काही वर्ष घालवावी लागणार आहेत, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. म्हणजेच, लस घेतल्यानंतरही कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन तेवढ्याच खबरदारीने करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, लस लागल्यानंतरही तोंडावर मास्क, हातात सॅनिटायझर व एकमेकांत शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा अंंमल करावाच लागणार आहे. मात्र संक्रांतीनिमित्त आयोजित हळकीकुंकूच्या नादात महिलांकडून या उपाययोजनांकडे बगल देण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकी हीच बाब कोरोनाला आपले पाय पसरण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. अशात महिलांच्या वाणालाही कोरोनाचा ठपका लागला असून, हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी पूर्वीप्रमाणेच सजग राहण्याची गरज आहे.
------------------------------
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही आवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.
----------------------------
कोरोना पसरतोय...
पॉझिटिव्ह मृत्यू
१४ जानेवारी २८ ०१
१५ जानेवारी १५ --
१६ जानेवारी ०७ --
१७ जानेवारी १२ --
१८ जानेवारी १४ --