संस्काराचे मोती’ने ज्ञानात भर
By admin | Published: January 13, 2016 02:30 AM2016-01-13T02:30:31+5:302016-01-13T02:32:57+5:30
लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देते.
‘अजया कठाणे : श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये पुरस्कारांचे वितरण
साखरीटोला : लोकमत वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित ‘संस्काराचे मोती’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देते. वृत्तपत्राच्या वाचनातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान प्रगल्भ बनत जाऊन त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात. अलीकडच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांना ‘संस्काराचे मोती’ स्पर्धा उपयुक्त असल्याने हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका अजया कठाणे यांनी केले. येथील श्री विद्या गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजीत ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे वार्ताहर सागर काटेखाये, पी.सी. बोपचे, एम.बी.पटले, के.पी. रहांगडाले, एम.के. कोरे,पी.बी. झा, कु.एन.एच. थदानी, एन.एस. काशिवार, डी.एस. बहेकार, कु.एस.एस. बडोले, कु.आर.एस. धोटे, कु.एस.के. रहांगडाले उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी काटेखाये यांनी, ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेविषयी माहिती देऊन लोकमतद्वारा विविध उपक्रम चालविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित अन्य पाहुण्यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रथम पुरस्कार तेजस्विनी बागडे, द्वितीय पुरस्कार मंगला भलावी तर तृतीय पुरस्कार माधुरी नेवारे हिला देण्यात आला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार बहाल करण्यात आले. संचालन टी.जी. फुंडे यांनी केले. आभार शिक्षिका थदानी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.डी. आईन्द्रेवार, एच.सी. वाघमारे, डी.ए. चिंधालोरे, ए.एन. वर्गन्टवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)