संतोष चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:17+5:302021-02-12T04:27:17+5:30
संतोष चव्हाण हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी बी.कॉम डी.एडपर्यंतचे शिक्षण घेतले असून ते प्रामाणिक, होतकरू मेहनती, ...
संतोष चव्हाण हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी बी.कॉम डी.एडपर्यंतचे शिक्षण घेतले असून ते प्रामाणिक, होतकरू मेहनती, जिद्दी व आपले कार्य निष्ठापूर्वक करणारे आहेत. पोलीस दलातील त्यांची १० वर्षांची सेवा झालेली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मोठे वडील प्रताप चव्हाण, वडील-रामा चव्हाण, आई-दुर्गाबाई चव्हाण, पत्नी-विद्या चव्हाण, मुलगी आरोही चव्हाण, गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तेजेन्द्र मेश्राम यांना दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २४ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित स्पर्धा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल १० फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत राज्यभरातून पोलीस दलातील ४,५२९ उमेदवार बसले होते. त्यापैकी १,४५१ उमेदवार शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरले आहेत.