सरस्वती महाविद्यालयाची यशाची भरारी कायम
By Admin | Published: May 27, 2016 01:44 AM2016-05-27T01:44:11+5:302016-05-27T01:44:11+5:30
स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय येथील किशोर ओंकार काळबांधे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत ९३.६९ टक्के गुण घेवून
विज्ञान शाखेतून किशोर : कला शाखेतून रोहिणी अव्वल
अर्जुनी मोरगाव : स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय येथील किशोर ओंकार काळबांधे या विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत ९३.६९ टक्के गुण घेवून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून प्रथम तसेच रोहिणी लाडे हिने कला शाखेतून ८४.१५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
या महाविद्यालयातून विज्ञान शाखेत १२६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातून प्राविण्य श्रेणीत २५, प्रथम श्रेणीत ८६ तर द्वितीय श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ५६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून किशोर ओंकार काळबांधे प्रथम (९३.६९ टक्के) आला. वसुधा यादोराव बुरडे (८८.९२ टक्के) द्वितीय तर भूमेश जगदीश भोयर (८६.०० टक्के) तृतीय ठरले आहे. कला शाखेत रोहिणी शेखर लाडे प्रथम ८४.१५ टक्के, माधवी नारायण हातझाडे ८०.७६ टक्के द्वितीय तर राजेश्वरी प्रमोद पातोडे ७९.५३ टक्के गुण घेवून तृतीय ठरली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ.वल्लभदास भुतडा, सचिव तथा प्राचार्य ए.आर. मंत्री यांनी गुणवंतांचा सत्कार केला. याप्रसंगी ए.आर. मंत्री यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच यश संपादन करावे व शाळेचा पालकांचा व गावाचा नावलौकीक वाढवावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व आई-वडीलांना दिले.(तालुका प्रतिनिधी)