सरस्वती विद्यालयाचा जयंत जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:47 PM2018-05-30T21:47:36+5:302018-05-30T21:48:32+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) जाहीर करण्यात आला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसरा आला असून जिल्ह्यातील ८९.३६ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी जयंत धर्माजी लोणारे याने सर्वाधिक ९७.६९ गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) जाहीर करण्यात आला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसरा आला असून जिल्ह्यातील ८९.३६ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा विद्यार्थी जयंत धर्माजी लोणारे याने सर्वाधिक ९७.६९ गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर याच विद्यालयाचा विद्यार्थी अभय देवराम चांदेवार याने ९७.०७ टक्के गुण घेऊन व्दितीय क्रमांक व तृतीय क्रमांक पल्लवी ढोमणे हिने ९६.९२ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक पटकाविला.
बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती.
बारावीनंतर खºया अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीत जास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुध्दा वर्षभर मेहनत घेत असतात. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २१ हजार ४३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
यापैकी १९ हजार १५१ विद्यार्थी उर्तीण झाले. निकालात यावर्षी सुध्दा जिल्ह्याने दुसरा स्थान कायम ठेवले आहे.
बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३५५ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी १० हजार ११२ विद्यार्थी (९७.६५) उर्तीण झाले. तर कला शाखेचे एकूण ९ हजार ७२७ विद्यार्थी होते. त्यापैकी ७ हजार ८४९ विद्यार्थी (८०.६९) उर्तीण झाले.
वाणिज्य शाखेचे एकूण ९०८ विद्यार्थी होते. यापैकी ८३९ विद्यार्थी (९२.४०) उर्तीण झाले. तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ४४१ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यापैकी ३५१ विद्यार्थी (७९.५९) उर्तीण झाले. विशेष म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
अर्जुनी मोरगाव तालुका सरस
मागील दोन तीन वर्षांपासून बारावी निकालाच्या टक्केवारीत सुधारणा होत आहे. यात तालुकानिहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुका सरस ठरला आहे. अर्जुुनी मोरगाव तालुका ९३.५७ टक्के, गोंदिया तालुका ९०.२० टक्के, आमगाव तालुका ९०.४१ टक्के, देवरी ७९.५६ टक्के, गोरेगाव तालुका ९०.९८ टक्के, सडक अर्जुनी ८४.६५ टक्के, सालेकसा ९१.०३ टक्के, तिरोडा तालुका ८८.८१ टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारी सुधारणा झाल्याने जिल्ह्याने नागपूर विभागातून दुसरे स्थान पटकाविले आहे.
विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कल
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून निकालाची टक्केवारी सुध्दा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७.६५ टक्के, कला शाखेचा ८०.६९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.४० टक्के आणि व्होकेशनल शाखेचा ७९.५९ टक्के निकाल लागल आहे. यावरुन विज्ञान शाखेची टक्केवारी वाढत आहे.
जिल्ह्यातील ४५ विद्यालयांनी गाठली शंभरी
बारावीच्या निकालात जिल्ह्यातील ४५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक विद्यालय गोंदिया तालुक्यातील असून त्या पाठोपाठ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून ४५ विद्यालयांनी शंभर टक्के टक्केवारी गाठली आहे.
येथेही सावित्रीच्या लेकी सरस
बुधवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे येथेही सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ७०० विद्यार्थिनीनी परीक्षा दिली. त्यापैकी ९१.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
एकूण ९ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८७.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली. मुलींनी मिळविलेल्या गुणांचे प्रमाणही मुलांच्या तुलनेत सरस असल्याचे दिसून येते..
१०० टक्के निकाल देणाºया जिल्ह्यातील शाळा
विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, गोंदिया
जानकीदेवी चौरागडे कनिष्ठ महाविद्यालय कुडवा, गोंदिया
प्रोग्रेसिव्ह उच्च माध्यमिक विद्यालय, गोंदिया
मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय, कामठा
मनोहरभाई पटेल सैनिकी हायस्कूल, गोंदिया
उमाबाई संग्रामे क. महाविद्यालय, नवेगावबांध
श्री संत ज्ञानेश्वर कला कनिष्ठ विद्यालय, दतोरा
श्रीराम कनिष्ठ विद्यालय, खमारी
जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय, एकोडी
जी.ई.एस.विज्ञान विद्यालय, कामठा
विमलताई कनिष्ठ विद्यालय, कटंगीकला
जी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय, रावणवाडी
जी.ई.एस.कनिष्ठ विद्यालय,दासगाव
शासकीय पी.बी.आश्रमशाळा, मिरजापूर
गुरूनानक हायस्कूल व क.विद्यालय, गोंदिया
फुंडे कनिष्ठ विद्यालय, फुलचूर
के.डी.भास्कर कनिष्ठ विद्यालय, डोंगरगाव
मात्रोश्री विज्ञान कनिष्ठ विद्यालय, नागरा
शंकरलाल अग्रवाल कनिष्ठ विद्यालय, बनाथर
राजस्थान इंग्लीश हायस्कूल, गोंदिया
साकेत ज्यूनीयर कॉलेज, गोंदिया
गणेशन ज्यूनीयर कॉलेज, गोंिदया
लिटील फ्लावर्स, गोंदिया
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, अर्जुनी-मोरगाव
जि.प.कनिष्ठ विद्यालय, अर्जुनी-मोरगाव
राजीव गांधी हायस्कूल, वडद
नवोदय आटर्स कॉलेज, नवेगावबांध
नूतन हिंदी हायस्कूल, अर्जुनी-मोरगाव
टी.डी.कनिष्ठ विद्यालय, येरंडी
जे.एम.बी.कनिष्ठ विद्यालय, अर्जुनी-मोरगाव
नत्थूजी पुस्तोडे कनिष्ठ विद्यालय, देवरी
प्रगती कनिष्ठ विद्यालय, परसटोला
रामकृष्ण कनिष्ठ विद्यालय, कुऱ्हाडी
एम.आय.पटेल हायस्कूल, सोनी
सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी
वसंतराव कनिष्ठ विद्यालय, सडक-अर्जुनी
सचिन लंजे कला विद्यालय, सडक-अर्जुनी
शासकीय उच्च कनिष्ठ विद्यालय व आश्रमशाळा, जमाकुडो