सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा ठरली पहिली तंबाखू मुक्त शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:25 AM2021-02-20T05:25:13+5:302021-02-20T05:25:13+5:30

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त ...

Saraswati Vidyaniketan Primary School became the first tobacco free school | सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा ठरली पहिली तंबाखू मुक्त शाळा

सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा ठरली पहिली तंबाखू मुक्त शाळा

Next

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया, शिक्षण विभाग,आरोग्य विभाग सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू मुक्त शाळा अभियान गोंदिया जिल्ह्यात जोमाने सुरू आहे. सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा मोरगाव अर्जुनी नऊ निकषानुसार गोंदिया जिल्ह्यातून पहिली तंबाखू मुक्त शाळा ठरली आहे.

गोंदिया जिल्ह्याने तंबाखू मुक्त शाळा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यातील शाळांनी तंबाखू मुक्त शाळेचे निकष अपलोड करून तंबाखू मुक्त शाळा घोषित केलेल्या आहेत .केंद्रीय आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र राज्य आरोग्य शिक्षण व आरोग्य विभागाने तंबाखू मुक्त शाळांचे सुधारित ९ निकष पारित केले असून जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी तंबाखू मुक्त शाळेचे निकष पूर्ण केले नव्हते. या शाळांचे निकष पूर्ण करण्याकरिता नियोजन करण्यात आले. याकरिता सलाम मुंबईचे संदेश देवरुखकर, आरोग्य प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभने,अर्चना गभने,आरती पुराम, महेश वालदे यांनी सहकार्य केले.

Web Title: Saraswati Vidyaniketan Primary School became the first tobacco free school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.