सरपंच पतीने ग्रामपंचायत सदस्याला केली जातीवाचक शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:58+5:302021-08-20T04:32:58+5:30

वडेगाव : ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीला विरोध केला, यासाठी त्या सरपंचपतीने ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ...

Sarpanch's husband insulted a Gram Panchayat member | सरपंच पतीने ग्रामपंचायत सदस्याला केली जातीवाचक शिवीगाळ

सरपंच पतीने ग्रामपंचायत सदस्याला केली जातीवाचक शिवीगाळ

Next

वडेगाव : ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या सरपंच महिलेच्या पतीला विरोध केला, यासाठी त्या सरपंचपतीने ग्रामपंचायत सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जेसीबीने खड्डा खोदून त्यात गाडून मारून टाकण्याची धमकीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी दिली. हा प्रकार मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्राम बोपेसर येथे घडला. यात सरपंचपतीसह सहाजणांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

शिवीगाळ व धमकी देणाऱ्यांमध्ये सरपंच पती तिरूपती हेमराज राणे, मदन नामाजी राणे, खुमेंद्र धनराज राणे, हेमराज काशिराम राणे, राजेश अशोक राणे व संतोष अशोक राणे यांचा समावेश आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासात घेतले आहे. चंद्रकुमार भाऊदास बिंझाडे (रा. बोपेसर) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. बिंझाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता ते नवीन अंगणवाडी इमारतीची जागा निवड करण्यासाठी उपसरपंच घनश्याम चंदूलाल पटले, ग्रामपंचायत सदस्य योगीराज हरिराम पटले व शाळा समितीचे अध्यक्ष सुनील मारुती भेलावे यांना बोलावून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले. यावेळी तेथे उपसरपंच यांच्यासोबत सरपंच रूपेश्वरी तिरुपती राणे यांचे पती तिरूपती हेमराज राणे होते. तिरूपती राणे ग्रामपंचायतीमध्ये येत असताना ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांनी त्याला अंगणवाडी इमारतीबाबत चर्चा करीत असल्याने बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र त्यांचे न ऐकता सरपंच पती ग्रामपंचायत कार्यालयात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांना जोरजोरात जातीवाचक शिवीगाळ देऊ लागला. शिवाय जेसीबीने खड्डा खोदून त्यात गाडून टाकून ठार मारण्याची धमकीसुद्धा दिली. यावेळी सरपंच पतीच्या कुटुंबातील मदन नामाजी राणे, खुमेंद्र धनराज राणे, हेमराज काशिराम राणे, राजेश अशोक राणे व संतोष अशोक राणे हे त्या ठिकाणी आले. या सर्वांनी बिझांडे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. गोंगाट ऐकून सुखदेव कारू सोनवाने, जयप्रकाश उरकुडा पटले, प्रदीप देवीलाल पटले, उमेश दिवान पटले, धनराज बालचंद रहांगडाले व इतर लोक त्या ठिकाणी गोळा झाले. या घटनेच्या आठ दिवसांपूर्वी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ सिमेंट रस्ता बांधकाम सुरू होते. ते काम बरोबर नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे हे कंत्राटदार तुळशी धानू बिंझाडे यांच्याशी बोलत होते. त्यावेळी आधीपासून तेथे उपस्थित असलेला सरपंचपती तिरूपती हेमराज राणे याने, तू काम थांबवायला आला, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. पण त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य बिंझाडे यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. सरपंच पतीच्या धमक्यांच्या भीतीमुळे बिंझाडे हे १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत जाऊ शकले नाहीत. या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकुमार बिंझाडे यांच्या तक्रारीवरून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव करीत आहेत.

Web Title: Sarpanch's husband insulted a Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.