सर्व समाज वर्ग शास्त्री वॉर्ड (जिजाऊ)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:31+5:302021-01-18T04:26:31+5:30
याप्रसंगी डॉ.गेडाम व भेलावे यांनी, सामाजिक समता निर्माण करून प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवणारी. प्रत्येक मावळ्यात शिवबा बघणारी, ...
याप्रसंगी डॉ.गेडाम व भेलावे यांनी, सामाजिक समता निर्माण करून प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवणारी. प्रत्येक मावळ्यात शिवबा बघणारी, मातृत्व व गुरुत्व असणारी कलावंत, शिल्पकार माता जिजाऊ आजच्या प्रत्येक स्त्री समोर एक आदर्श ठेऊन जाते. जुनाट रूढी परंपरा व चालीरीतींना झुगारून स्त्री शिक्षणाची दारे उघडणाऱ्या सावित्रीबाईंचा गौरव करावा, तेवढा कमीच आहे. फुले दाम्पत्याला घराबाहेर हाकलले, तेव्हा फातिमा शेख व त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी त्यांना राहण्याकरिता जागाच नव्हे, तर समोर शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याकरिता सहकार्य केले. स्वतः फातिमा शाळेत शिकवू लागल्या. पहिली मुस्लीम महिला शिक्षकाचा मान फातिमा माऊलीस जातो. अशा या कर्तबगार मातांचे आदर्श उराशी बाळगून स्त्रियांनी वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी कल्पना चव्हाण, मनू उके, गायत्री चिरवतकर, दीपा मेश्राम, नैना अग्रवाल, कुसुम ठाकरे, मंजू चव्हाण, मुस्कान सोमनकर, निपाने, दुर्गा जायस्वाल, गुड्डी वाढई, बांगरे, खडसे, कल्पना मेंढे, भांडारकर, रजनी मेश्राम, क्षीरसागर, खिरेकर, अंजली भोंगाडे, अवनी चिरवतकर, श्रुती अग्रवाल, रानी सैय्यद, डिम्पी भांडारकर, अंकुश क्षीरसागर, सुलभा गोनमोडे, निलू क्षीरसागर, समीर चव्हाण, साक्षी भेलावे, छायांकी भेलावे, ओबीसी संघर्ष कृती समिती कोषाध्यक्ष कैलाश भेलावे, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे यांनी सहकार्य केले.