सातगाव-साखरीटोला झाला कन्टेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:26+5:302021-04-11T04:28:26+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सालेकसा तालुका सुद्धा यात मागे नाही. आमगाव-देवरी मार्गावरील साखरीटोला येथे १३ रुग्ण, तर वॉर्ड ...

Satgaon-Sakharito became a containment zone | सातगाव-साखरीटोला झाला कन्टेन्मेंट झोन

सातगाव-साखरीटोला झाला कन्टेन्मेंट झोन

Next

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सालेकसा तालुका सुद्धा यात मागे नाही. आमगाव-देवरी मार्गावरील साखरीटोला येथे १३ रुग्ण, तर वॉर्ड नं. ३ असलेल्या सातगाव येथे १८ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले. त्यामुळे दररोज येथील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरीक भयभीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारा मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढेही आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तीनही वॉर्डातील लोकांची तपासणी करण्याचे कार्य हातात घेतले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व अलगीकरणात असलेल्या लोकांनी बाहेर फिरू नये व इतरांच्या संपर्कात येऊन नये. यासाठी सातगावला कन्टेन्मेंट झोन घोषित करुन गावात प्रवेशबंदी करून सील केले आहे. यासाठी मंडळ अधिकारी डी. हत्तीमारे, विस्तार अधिकारी निमजे, सरपंच नरेश कावरे, तलाठी काकडे, तलाठी पटले, ग्रामसेवक रहांगडाले कार्यरत असून, प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Satgaon-Sakharito became a containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.