सटवाचे गावकरीच झाले त्यांच्यासाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:00 AM2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:35+5:30

त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले. या महादानाने सारं गावं काही वेळासाठी ऐकमेकांसाठी कृतज्ञ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

The satva villagers became angels for them | सटवाचे गावकरीच झाले त्यांच्यासाठी देवदूत

सटवाचे गावकरीच झाले त्यांच्यासाठी देवदूत

Next
ठळक मुद्देहे महादान नव्हे खरी माणुसकी : सटवा ग्रामपंचायतचा उपक्रम,गरजूंना दिले धान्य

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : आपल्या जवळच्या लोकांची खरी ओळख संकटकाळात होत असते.कदाचित हे तेवढेच खरे सुध्दा असावे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची मोठी परवड झाली आहे. अशांच्या मदतीसाठी काही सामाजिक व स्वंयसेवी संस्था, लोकप्रतिनिधी धावून जात आहे.मात्र आपल्या मिळालेल्या अन्नधान्याची सध्या आपल्याला गरज नाही. आपल गाव म्हणजे आपल कुटुंबच होय. त्यामुळे यातील काही अन्नधान्य गरजूंना दिले तर त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. नेमकी हीच भावना तालुक्यातील सटवा येथील गावकऱ्यांनी जपत आपल्या गावातील गरजूंना अन्नधान्याची मदत केली. त्यामुळे गावकरीच गावातील गरजूंसाठी खरे देवदूत झाल्याचे चित्र पाहयला मिळाले.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या लाकडाऊनच्या संकटामुळे एकीकडे नागरिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तर दुसरीकडे देणाºया देत जावे व घेणाऱ्या घेत जावे असे चित्र आहे. मात्र तालुक्यातील ग्रांमपंचायत सटवा येथील नागरिकांनी जो आदर्श पुढे ठेवला आहे. तो कल्पनेच्या पलीकडे आहे.
भुकेच्या पलीकडे जाऊन महादान नव्हे तर माणूसकी जपली आहे. एक पूर्ण पोळी खाणे म्हणजे विकृती व तीच पोळी अर्धी अर्धी वाटून खाणे म्हणजे संस्कृती. हीच संस्कृती सध्या सटवा गावात जपली जात आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप केले. पण सटवा ग्रामपंचायतमध्ये सरपंच विनोद पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना मिळालेले तांदूळ स्वत:लाभार्थ्यांनी अति गरजू कुटुंबाना देत गावात स्वत:चा आदर्श निर्माण केला आहे. शासनाने गरजू शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ वाटप केले.
त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले.
या महादानाने सारं गावं काही वेळासाठी ऐकमेकांसाठी कृतज्ञ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. संकटे येतात आणि जातात पण या संकटप्रसंगी जी माणसे उभी असतात ती अविष्कार घडविणारी असतात. सटवा या अकराशे लोकवस्तीच्या गावाने जे काही महादान केले ते अनेकांना विचार करण्यास लावणारे आहे. या गावात १३५ बीपीएल, ९३ अंत्योदय व २२ सामान्य लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना मंगळवारपासून मोफत तांदूळ वाटप झाले. पाहता-पाहताच अनेकांनी महादान करून सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाचे महाभयंकर संकट माणसांच्या जिवावर उठले आहे. अशावेळी आपसातले वैर विसरून गावकऱ्यांनी एकसंघ राहीले पाहीजे ही सरपंचाची विचारसरणी जगण्यातले खरे मर्म सांगणारी आहे. सटवा हे शासनाच्या सर्वच योजनेची अंमलबजावणी करणारे गाव.
या गावातील नागरिक थोड्या-थोड्या मिळकतीत आपल्या जीवनाचा व कुटूंबाचा रहाटगाडा हाकलत असतात. रोज मिळेल रोज भागेल या मुलमंत्राची गाठ बांधून सटवा जगतोय,अभिमानाने गावची इज्जत गावातच राखून कुणालाही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत आहे.

Web Title: The satva villagers became angels for them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.