स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 09:14 PM2017-07-30T21:14:15+5:302017-07-30T21:14:39+5:30

पूर्व विदर्भातील मुली ह्या हवाई सुंदरी होणे हे पूर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला.

savapana-saakaaranayaasaathai-paraisarama-karaa | स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा

स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा

Next
ठळक मुद्दे राजकुमार बडोले : हवाई सुंदरी मुलाखत पूर्वतयारी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पूर्व विदर्भातील मुली ह्या हवाई सुंदरी होणे हे पूर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला. या होतकरु मुलींना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याचे काम बार्टी करीत आहे. मुलींनी आता हवाई सुंदरीचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
२९ जुलै रोजी अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या वतीने आयोजित एअर इंडियातील हवाई सुंदरी च्या ४०० रिक्त जागांकरीता मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुमरे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य रामलाल मुंगनकर, राजेश कठाणे, तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष नामदेव कापगते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, एअर इंडियाचे केबीन प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, मागील अडीच वर्षापासून आपण या खात्याचा मंत्री म्हणून अनेक कामे केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यात येत आहे. मागील वर्षी ७५ विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविले आहे. वाढती बेरोजगारी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी ३० हजार मुला-मुलींना स्वयंरोजगार व स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये गटई कामगार, अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया कामगारांचे पाल्य व अन्य व्यवसायातील कामगारांच्या पाल्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम बार्टीमार्फत करण्यात येत आहे. जगातील उत्कृष्ट २०० विद्यापिठाच्या यादीत भारतातील एकाही विद्यापिठाचा समावेश नसल्याची खंत व्यक्त करून उच्च शिक्षणासाठी बहुजन समाजाची मुले विदेशात गेली पाहिजे. बार्टीकडून दिल्लीतील नामांकित संस्थेत मागासवर्गीय मुला-मुलींना संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी चांगले यश मिळविले. यावर्षी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठविलेल्या १४ मुला-मुलींची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
गहाणे म्हणाल्या, जिल्ह्यातील मुलींना हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न या पुर्व प्रशिक्षणातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बार्टीने योग्य मार्गदर्शन व दिशा दिल्यामुळे जास्तीत जास्त मुलींची निवड या कार्यशाळेतून होणार असल्याचे म्हणाल्या. हवाई सुंदरीच्या या मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील २१३ युवती उपस्थित होत्या. एअर इंडियाचे हवाई सुंदरी प्रशिक्षक हेमंत सुटे, आशुतोष नगराळे, स्टेफी निकोलस, श्रीकांत राऊत, नेहा जवादे व कुणाल चौकीकर यांनी उपस्थित युवतींची मुलाखत, संवाद कौशल्य चाचणी, शिक्षण, उंची व शैक्षणकि पात्रतेची कागदपत्रे तपासली. या कार्यशाळेतून ६० युवतींची निवड हवाई सुंदरी पुर्वतयारी प्रशिक्षणासाठी केली. पुर्वतयारीसाठी त्यांना आता लेखी परीक्षा, प्रश्नावली, गटचर्चा, वैद्यकीय तपासणीची तयारी करावी लागणार आहे. एअर इंडियात हवाई सुंदरी म्हणून निवड झालेल्या गोंदिया येथील मोहिनी मेश्राम व भंडारा येथील द्विपल बिसने या युवतींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या युवतींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवसूदन धारगावे, संचालन प्रा.किशोर शंभरकर तर आभार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी मानले.

Web Title: savapana-saakaaranayaasaathai-paraisarama-karaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.