लटोरीची योजना वाचवा
By admin | Published: May 15, 2017 12:16 AM2017-05-15T00:16:40+5:302017-05-15T00:16:40+5:30
सालेकसा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण जनतेला शुद्ध: पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्याकरीता कोट्यवधीचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली
जगदीश शर्मा यांची आर्त हाक : जिल्हा परिषदेला हस्तांतरित झालीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा तालुक्यातील आदिवासी ग्रामीण जनतेला शुद्ध: पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्याकरीता कोट्यवधीचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली लटोरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वाचवा अशी आर्त हाक अखिल भारतीय ग्राहक पंचायत आमगावचे संगठन मंत्री जगदीश शर्मा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव यांना केली आहे.
सालेकसा तालुक्यातील लटोरी, आमगाव खुर्द, मुंडीपार, कोटरा, बाम्हणी, रोंढा, गोर्रे, बिजेपार, दरबडा, धानोली, नान्हवा, गिरोला, खोलगड, बिंजली, तिरखेडी, झालिया, कावराबांध, नवेगाव, कोटजंभूरा, लोहारा या गावाना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याच्या उद्देशाने युती सरकारने बनगाव आणि लटोरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. तत्कालीन सरकार मधील वित्त आणि नियोजन मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या योजनेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते.
या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून पुढील देखभाल दुरूस्ती करीता द्यावे, असे शासनाचे धोरण होते. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाली परंतु लटोरी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अद्याप जिल्हा परिषदेला हस्तांतरित झाली नाही. परिणामी या योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्रातील साहित्याचे नुकसान होत आहे. सदर योजनेला वाचविण्यात यावे अशी, मागणी शर्मा यांनी केली आहे.