दुर्मिळ वृक्षांचे रोपवाटिकेत जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 08:51 PM2018-05-08T20:51:09+5:302018-05-08T20:51:09+5:30

दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मिळतील.

Save in the rarest of rare trees | दुर्मिळ वृक्षांचे रोपवाटिकेत जतन

दुर्मिळ वृक्षांचे रोपवाटिकेत जतन

Next
ठळक मुद्देकरुच्या वृक्षांची करणार लागवड : अभिमन्यू काळे यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मिळतील. ही वेळ येऊ नये यासाठी जिल्ह्यातील दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलीत करुन त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील रोपवाटीकेत केले जात आहे.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने दुर्मिळ वृक्षांचे जतन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी काळे हे निर्सगप्रेमी असून त्यांनी मागील वर्षीपासून जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची मोहीम सुध्दा सुरू केली आहे.
गोंदिया जिल्ह्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य, सारस संवर्धन मोहीमेमुळे बाहेरील पर्यटकांना जिल्हाकडे आकर्षीत करण्यास या सर्व गोष्टींची मदत होत आहे. हीच बाब ओळखून काळे यांनी जिल्ह्याचे पूर्ण भ्रमण केले.
या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जुनी वृक्ष आढळली. यानंतर त्यांनी या शंभर वर्षे जुन्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी संबंधीत शेतकºयाला वर्षाला १ हजार रुपये पेशंन देण्यास सुरूवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो जुन्या वृक्षांचे जतन करण्यास मदत झाली.
ही मोहीम राबवित असतानाच त्यांनी दुर्मिळ होत चाललेल्या अनेक वृक्षांचे जतन कसे करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू केले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची मदत घेवून दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यास सांगितले. हे बियाणे गोळा केल्यानंतर त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम सध्या मुरदोली येथील रोपवाटीकेत सुरू आहे.
बेल, मोहा, सिवन, कवट, आंजन, बीजा, जांभुळ, पुत्रजिवा, चिंच, बेहडा, अमलतास, रिठा, पांढरा शिरस, मोहई, आपटा, चार, साजा, उंबर, तेंदू, सिसम, वड, पिंपळ या वृक्षांचे रोपटे तयार करण्याचे काम सुरू केले. सध्या या रोपवाटीकेत ४२ प्रकारच्या प्रजातीचे २ लाख ७२ हजार ११५ रोपटे तयार करण्यात आले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत
वनविभागाची मुरदोली येथील रोपवाटीकेची विशेष ओळख आहे. रोपवाटीकेत मिसचेंबर, हार्डलिंग चेंबर, लोखंडी स्टॅन्ड, रुट ट्रेनर आदी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या रोपवाटीकेला हॉयटेक रोपवाटीका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी सांगितले.
करुने बहरणार गोंदिया-कोहमारा मार्ग
करुचे झाड पांढºया रंगाचे असून या झाडाचा रंग त्रृतुनुसार बदल असतो. हे वृक्ष दुर्मिळ समजले जाते. या दुर्मिळ वृक्षाचे जतन करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी गोंदिया-कोहमारा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा करुच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग करुच्या वृक्षांनी बहरणार आहे.

जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनस्पतींची झाडे आहेत. मात्र त्यांचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बºयाच वृक्षांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या सर्व वृक्षांचे जतन कसे करता येईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहे.
अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी गोंदिया.

Web Title: Save in the rarest of rare trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.