सामूहिक विवाहांमुळे वेळ व पैशांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:33 PM2018-04-19T21:33:05+5:302018-04-19T21:33:05+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुरूप आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. शासनही त्याला पुढाकार देतो. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांच्यात आपुलकी आणि प्रेम वाढते.

Save time and money due to group weddings | सामूहिक विवाहांमुळे वेळ व पैशांची बचत

सामूहिक विवाहांमुळे वेळ व पैशांची बचत

Next
ठळक मुद्देनाना पटोले : क्षत्रिय मरठा कलार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुरूप आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. शासनही त्याला पुढाकार देतो. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांच्यात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे अशा आयोजनासाठी समाजातील जवाबदार सर्व व्यक्ती व नवयुवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशा सामूहिक सोहळ्यांतून समाजातील लोकांच्या वेळ व पैशांची बचत होते, असे प्रतिपादन माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
येथील क्षत्रिय मराठा कलार समाजाच्यावतीने बाजपेई वॉर्डातील समाजभवनात आयोजीत सामुहिक लॉनच्या पटांगणावर घेण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळा व नवीन समाजभवनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी क्षत्रीय मरठा कला समाजाचे अध्यक्ष मनिष चौरागडे, मदन पाल्हेवार, रामनारायण भोयर, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, उपविभागीय अभियंता शिखा पिपलेवार, अमर वºहाडे, माधोराव भोयर, सुरेश चौरागडे, महेंद्र डोहळे, पालकचंद सेवईवार, डुमेश चौरागडे, भागवत धपाडे, नेतलाल चौरागडे, प्रल्हाद दियेवार, दिलीप चौरागडे, तपन कावळे, धमेंद्र डोहळे, जि.प. सदस्य ललीता चौरागडे, जयश्री शिरसाटे, अमरदास डाहाके, महाप्रकाश बिजेवार, दिलीप धपाडे, बिनाराम चौरागडे, धमेंद्र धपाडे, नारायण कावळे, राजेंद्र डाहाके, सिंधू पिपलेवार, भूमिका चौरागडे, ज्योती कावळे, नेहा धुवारे, रेखा चौरागडे, आरती धपाडे, रोशनी चौरागडे, कल्पना डाहाके, धनश्री पालेवार, ज्योती डोहळे, संतोष बारेवार तसेच महिला समिती, नवयुवक सेवा समिती, कार्यकारिणी मंडळ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले यांनी, समाजाच्या विकासाची चर्चा सर्वच करतात. परंतु चर्चा पोस्टर लावण्यापूर्वीच मर्यादित राहते. देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकºयाला, मजुराला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. शेतकºयाने लावलेल्या बियाण्यांचा खर्च निघत नाही. त्यांच्या मालाला भाव नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरी वर्तमान सरकार कर वसुली करीत आहे. समाज, शेतकरी व मजूर वर्गाने आपल्या हक्कासाठी समोर येवून आता लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. उपविभागीय अभियंता शिखा पिपरेवार यांनी, समाजातील युवक-युवतींनी समोर येऊन समाजाची सेवा करावी. शिक्षण घेवून प्रशासनात काम करावे. समाज घडविण्याचे कार्य करण्याची गरज आहे. आपणही समाजातील गरीब, हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन आर्थिक मदत करण्यासाठी तत्पर राहू, असे मत व्यक्त केले. तर समाजाचे अध्यक्ष चौरागडे यांनी, आपल्यावर दिलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करु. समाज चांगले घडवून प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्य करु. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करु. यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे सांगीतले.
संचालन शरद डोहरे यांनी केले. आभार निलकंठ सिरसाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चंद्रशेखर धुवारे, दीपक कोल्हे, रमेश भोयर, पंकज सोनेवाने, अनिल सोनेवाने, प्रदीप बारेवार, लोकेश भोयर, दिनेश बारेवार, रजत धुवारे, विक्की कावडे, सत्यम पिपलेवार, सचिन सोनवाने, दुर्गेश बिजेवार, रोहित जमईवार, नरेश डोहरे, कमल धुवारे, हर्षल चौरागडे, रजत धुवारे, शुभम धुवारे, रेवलाल चौरागडे, अंकित चौरे, मीना चौरागडे, चेतना डोहरे, रेखा धुवारे, श्वेता कावळे, सरिता डोहळे, कितर्ई गजघाट, कांती बिजेवार, तृप्ती चौरागडे, त्रिवेणी कावळे, बबीता कावळे, वर्षा चौरागडे, अंकिता कावळे, शारदा दियेवार, अनुराधा कावळे, निशा जमईवार, रेखा चौरागडे, अनुराधा जमईवार, सरिता चौरीवार, अनुसया कावळे, रविता डोहळे, दिप्ती चौरागडे, सुग्रता कावळे यांनी सहकार्य केले.
समाजभवनासाठी लोकनिधी
बाजपेयी वॉर्ड, मुर्री रोड येथे समाजभवनासाठी माजी खासदार पटोले यांनी २० लाखांचा निधी दिला. याबद्दल क्षत्रिय मराठा कलार समाज गोंदिया-भंडारा यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी पटोले यांनी, समाज भवनासाठी निधी उपलब्ध करुन देणे माझी ही जबाबदारीच होती व आहे. मी निधी उपलब्ध करुन दिला तो मोठा नाही. या अगोदर मोठमोठे नेते आश्वासन देऊन गेले, पण निधी कुणीच दिला नाही. याबद्दल समाजात चर्चा होती असे सांगीतले. तसेच समाजातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून कामही प्रगतीपथावर आहे.
१५ जोडपी विवाहबद्ध
क्षत्रिय मरठा कलार समाज सेवा समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ््यात १५ जोडपी विवाहबद्ध झाली. या जोडप्यांना समाजाच्यावतीने भेटवस्तू देण्यात आल्या. मंगलाष्टके बोलून समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे वर-वधू परिणय सूत्रात अडकले.

Web Title: Save time and money due to group weddings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.