सामूहिक विवाह सोहळ््यांतून वेळ व पैशांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:20 PM2019-01-24T22:20:07+5:302019-01-24T22:21:00+5:30
विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : विवाह सोहळ््यांवर आज मोठा खर्च करावा लागतो. त्यात वेळ व श्रम लागते. अशात आपल्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक विवाह सोहळ््यात करून समाजबांधवांनी वेळ व पैशांची बचत करावी, असे प्रतिपादन भरत वाघमारे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शनिवारी (दि.१९) आयोजीत बौद्ध समाजाच्या उपवर-वधू परिचय संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन समितीचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक डी.एस. टेंभूर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे माजी अध्यक्ष सोमकांत भालेकर, राजेंद्र सांगोळे, प्रकाश गणवीर, पुरुषोत्तम वासनिक, डॉ. चंद्रकिर्ती कांबळे, रमा बोरकर, प्रफुल्ल शिंगाडे, पंचायत समिती सदस्य रामेश्वर श्यामकुवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध यांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन तसेच सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. याप्रसंगी देवराम मेश्राम यांनी, जीवनाचे अर्थशास्त्र याविषयावर तर भालेकर यांनी विवाह सोहळ्यातून धम्मसंस्कार या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक समितीचे महासचिव योगेश रामटेके यांनी मांडले. संचालन अनिल मेश्राम व प्रियंका लोणारे यांनी केले. आभार संदीप मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांनी सहकार्य केले.
६९ उपवर-वधूंचा परिचय
बौैद्ध समाजाच्या या उपवर-वधू परिचय संमेलनात मोठ्या संख्येत समाजबांधवांनी आपल्या मुला-मुलींसह भाग घेतला. या संमेलनात समाजातील ६९ मुला-मुलींनी आपला परिचय दिला.