कत्तलखान्यात जाण्यापासून ४२ जनावरांना वाचवले

By नरेश रहिले | Published: July 20, 2024 06:32 PM2024-07-20T18:32:31+5:302024-07-20T18:34:18+5:30

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : २३.६८ लाखांचा माल जप्त

Saved 42 animals from going to slaughter house | कत्तलखान्यात जाण्यापासून ४२ जनावरांना वाचवले

Saved 42 animals from going to slaughter house

नरेश रहिले
गोंदिया :
कत्तलखान्यात घेऊन जाण्यासाठी जनावरांची वाहतूक करणारा ट्रक डुग्गीपार पोलिसांनी पकडला. शुक्रवारी (दि.१९) मध्यरात्री २ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ट्रक व जनावरे, असा २३.६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


जनावरांना कत्तलीकरिता ट्रकमध्ये घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक मंगेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ५३ वरील ग्राम फुटाळा येथे शुक्रवारी (दि.१९) मध्यरात्री २ वाजेदरम्यान सापळा लावला. यामध्ये त्यांना ट्रक क्रमांक सीजी २३-बी ०२३५ दिसून आला व त्यांनी ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात ४२ जनावरांना निदर्यतेने कोंबून ठेवल्याचे दिसून आले. यावर पोलिसांनी तीन लाख ६८ हजार रुपये किमतीची जनावरे व २० लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच ट्रक चालकावर डुग्गीपार पोलिसांत प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) सहकलम ५५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हनवते करीत आहेत.

Web Title: Saved 42 animals from going to slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.