विद्यार्थ्यांनी तयार केली बचत बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:02 AM2019-03-08T00:02:33+5:302019-03-08T00:02:53+5:30

शालेय विद्यार्थ्यांना काटकसर करण्याची सवय लागावी, पैशांची बचत करण्याची आवड निर्माण व्हावी, पैशाची बचत करुन जमा केलेला पैसा पुढील शिक्षणात उपयोगात यावा.

 The savings bank created by the students | विद्यार्थ्यांनी तयार केली बचत बँक

विद्यार्थ्यांनी तयार केली बचत बँक

Next
ठळक मुद्देकटंगटोला शाळेचा प्रयोग : खाऊच्या पैशांची होणार बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : शालेय विद्यार्थ्यांना काटकसर करण्याची सवय लागावी, पैशांची बचत करण्याची आवड निर्माण व्हावी, पैशाची बचत करुन जमा केलेला पैसा पुढील शिक्षणात उपयोगात यावा. व्यर्थ सवयी पैसा घालण्यात टाळता यावा या उद्देशाला समोर ठेवून मुलांनी शाळेत पैसा जमा करण्याकरिता शाळेत शिकणाऱ्या मुलांकरिता संचयनी बँकेची सुरुवात करण्यात आली आहे.
गोंदिया तालुक्यातील कामठा केंद्रांतर्गत ग्राम कटंगटोला येथील जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेत हा प्रयोग करण्यात आला आहे.
उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ईश्वरी बाहे यांच्या हस्ते विषय शिक्षक जी.सी. गणवीर यांच्या अध्यक्षतेत व मुख्याध्यापक एस.व्ही. बंसोड, वाय.एस. येल्ले, के.एस. कलमकार, वाय.एम. दाऊदसरे, एन.एल. माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या बँकेत मुलांनी जमा केलेला पैसा सुरक्षीत राहणार असून पैसे जमा करणे, काढणे सर्व जवाबदारी वर्ग ७ व ८ वीच्या मुलांकडे राहणार आहे. संचयनी बॅँकेमध्ये जमा पैसा मुख्याध्यापकांकडे जमा होणार असून याचे खाते जवळच्या बँकेत खोलून त्यात जमा केला जाईल असे मुख्याध्यापक बंसोड यांनी सांगितले.

Web Title:  The savings bank created by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.