शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:30 PM2018-09-09T21:30:01+5:302018-09-09T21:30:43+5:30

शासकीय रक्त संकलन पेढीत ‘ए’ पॉझीटीव्ह रक्ताचा आजघडीला तुटवडा आहे. रक्तदान कमी व रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे या रक्तसंकलन पेढीला रक्तदान शिबिराची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जिवन मरणाच्या दारात असलेल्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या या रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी तरूणांना स्वयंस्फूर्तीने रक्त देण्याची गरज आहे.

Scarcity of blood in government blood bank | शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

Next
ठळक मुद्देरक्तदान शिबिरांची गरज : रक्तदात्याला डोनरकार्डवर तपासणी शुल्क नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय रक्त संकलन पेढीत ‘ए’ पॉझीटीव्ह रक्ताचा आजघडीला तुटवडा आहे. रक्तदान कमी व रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे या रक्तसंकलन पेढीला रक्तदान शिबिराची मोठ्या प्रमाणात गरज आहे. जिवन मरणाच्या दारात असलेल्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या या रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा व्हावा यासाठी तरूणांना स्वयंस्फूर्तीने रक्त देण्याची गरज आहे.
गोंदिया जिल्ह्यातील साडे तेरा लाख लोकसंख्येसाठी एकमेव रक्त संकलन पेढी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आहे. वर्षाकाठी ७०० युनिट रक्त संकलीत करून रूग्णांना पूरविण्याचे काम या रक्त संकलन पेढीतून होते.
या रक्त संकलन पेढीतून ९० टक्के रक्त शासकीय रूग्णालयातील रूग्णांना तर १० टक्के रक्त खासगी रूग्णालयातील अत्यंत गरजू रूग्णांना देण्यात येते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाते. परंतु खासगी रक्तसंकलन पेढ्या जिल्ह्यातील रक्तसंकलन करून नागपूर येथे नेतात.
गोंदिया जिल्ह्यातील गोरगरिबांना रक्त मिळावे म्हणून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तपेढीत तरूणांनी रक्तदान करण्याची गरज आहे. नेत्यांचा वाढदिवस, सण, उत्साह, संस्थांचा वर्धापण दिन अनेक लोक रक्तदान शिबिराच्या आयोजनातून साजरा करतात.
काही लोक शासकीय रक्तसंकलन पेढीला तर काही खासगी पेढ्यांना रक्त देतात. परंतु खासगी रक्तसंकलन पेढ्यांकडे जाणाºया रक्ताच्या एका बॉटलवर रक्तदात्याकडून तपासणी शुल्कच्या नावावर एक हजार २०० रूपयांच्या घरात पैसे घेतले जातात. परंतु शासकीय रक्तसंकलन पेढीत रक्तदान दिल्यास डोनरकार्डवर रक्ताचा पुरवठा केला जातोच शिवाय तपासणी शुल्क घेतले जात नाही, असे रक्त संकलन अधिकारी डॉ.गेडाम यांनी सांगितले.
गणपती उत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज
शासकीय रक्तसंकलन पेढीला रक्तदान करण्यासाठी जिल्ह्यातील मोजक्या गणपती उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. परंतु हजारोंच्या घरात असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेला नाही. गोरगरीब रूग्णांना जीवनदान देण्यासाठी गणेश मंडळांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त शासकीय रक्तसंकलन पेढीला देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Scarcity of blood in government blood bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.