गारपिटीचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:16+5:30

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती.

Scatter the hail crops | गारपिटीचा पिकांना फटका

गारपिटीचा पिकांना फटका

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण : तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान, मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर सर्वाधिक नुकसान भाजीपाला पिकांचे झाल्याचे कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. सुरूवातीला रब्बी हंगामासाठी अनुकुल वातावरण असल्याने पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र सोमवारी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली.जवळपास अर्धा तास पाऊस आणि पंधरा मिनिटे गारपिट झाल्याने रस्त्यांवर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. गहू, हरभरा, वटाणा ही पिके बहरत असतानाच त्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याने ही पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. मंगळवारी सकाळीच अनेक शेतकºयांनी आपआपल्या शेताकडे धाव घेत पिकांची पाहणी केली. मात्र कालपर्यंत डोलणारे पीक पूर्णपणे भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे भरुन आले. मोठ्या मेहनतीने आणि रक्ताचे पाणी करून शेतकºयांनी रब्बीतील पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाच्या मनात काही वेगळेच असल्याने शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका १५०० हेक्टरमधील कोबी,टमाटर, वांगी, बिन्स, वटाणा या भाजीपाला पिकांना बसला.
त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हाधिकाºयांकडे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात ३ हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

६० घरांची पडझड
सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील ६० घरांची पडझड झाली असून जवळपास ३ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे.
२५९ मि.मी.पावसाची नोंद
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.जवळपास अर्धा ते पाऊनतास पावसाने सर्वत्र हजेरी लावली असून एकूण २५९ मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.यात गोंदिया १०० मि.मी.,गोरेगाव ६.२० मि.मी., तिरोडा ६.२०,अर्जुनी २ मि.मी.,देवरी ७.४०, आमगाव ७०.५० मि.मी., सालेकसा ५३.०, सडक अर्जुनी २०.६० मि.मी.पावसाची नोंद झाली होती.
केंद्रावरील धान भिजले
सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र नेमके किती नुकसान झाले हे सांगण्यास या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळले.

Web Title: Scatter the hail crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस