भंगारवाले करू लागले आता भाजीविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:00 AM2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:28+5:30

कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना ते बंद करून घरात बसावे लागले आहे. यामध्ये शहरात फिरून भंगार खरेदी करणाऱ्यांचा समावेश आहे.

The scavengers started selling vegetables now | भंगारवाले करू लागले आता भाजीविक्री

भंगारवाले करू लागले आता भाजीविक्री

Next
ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ इफेक्ट : रोजगारासाठी धडपड, स्वरुप बदलतेय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून त्यात ‘लॉकडाऊन’मुळे कित्त्येकांचा रोजगार हिरावला गेला आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था धावून आल्या आहेत. मात्र घरात बसून खाणे उचित नसल्याने भंगार खरेदी करणारे आजघडीला भाजविक्रीचे काम करीत असल्याचे दिसून येत आहेत. कसेही चार पैसे हाती यावे व कुणा पुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठीच त्यांची या कठीण परिस्थितीशी लढाई सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभू्मीवर मागील दीड महिन्यांपासून देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. यामुळे उद्योगधंदे बंद झाले आहे. त्यात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड आली आहे. तर ‘लॉकडाऊन’मध्ये घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने लहान-सहान व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना ते बंद करून घरात बसावे लागले आहे. यामध्ये शहरात फिरून भंगार खरेदी करणाऱ्यांचा समावेश आहे. हातठेला घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरून लोकांच्या घरांतील भंगार साहित्य खरेदी करणारे भंगारवाले आपला उदरनिर्वाह चालवितात. मात्र ‘लॉकडाऊन’मध्ये त्यांना आपला हा व्यवसाय बंद करावा लागला आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. समाजात कित्येक गरजू असून त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था धावून आल्या आहेत.
धान्याचे किटच काय भाजीपाला सुद्धा त्यांना जेवणासाठी पुरविला जात आहे. मात्र आपले शरीर काम करीत असताना कुणावर अशाप्रकारे अवलंबून राहणे योग्य नसल्याने शहरातील अनेक भंगारवाले आज भाजीविक्रीचे काम करीत आहेत. भंगार खरेदीसाठी वापरात येणारे हातठेले त्यांनी आता भाजी ठेवून विक्री करण्याच्या कामात आणले आहे. भंगार खरेदीसाठी दिवसभर फिरून दोन पैसे कमावित होते. आता तसेच दिवसभर फिरून भाजी विकून रोजगार मिळविणारे हे कालचे भंगारवाले आत भाजी विक्रे ता म्हणून सांगत आहेत.

गरिबांच्या हक्कावर डल्ला नको
आज आम्ही घरात बसून मदत करणाऱ्यांकडून धान्य व भाजीपाला घेऊन आपला उदरनिर्वाह करणे योग्य नाही. आम्ही हात-पाय चालवून दोन पैसे कमाविण्याच्या स्थितीत आहोत. मात्र खरोखरच ज्यांना या मदतीची गरज आहे. त्यांचा हक्क हिरावण्याचा हा प्रकार होणार. त्यामुळे गरिबांच्या हक्कावर डल्ला न मारता आम्ही भाजी विकून आपला उदरनिर्वाह चालवित आहोत. मदतीची खरी गरज ज्यांना आहे त्यांना मिळणे अधिक गरजेचे असल्याचेही भंगार खरेदी करणारे सांगतात.
ठेला भाजी विक्रीच्या कामात
पूर्वी कबाडवाले लोकांच्या घरातील भंगार खरेदीसाठी हातठेला घेऊन घरोघरी जात होते. मात्र आता तोच हातठेला त्यांना भाजी विक्रीच्या कामातही उपयोगी पडत आहे. फक्त फरक एवढाच की पूर्वी या ठेल्यावर माल खरेदी करून ठेवला जात होता. तर आता ठेल्यात ठेवलेला माल विकला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन्ही व्यवहार फक्त दोन पैसे कमाविण्यासाठी होत असून यातील ठेला व ठेला मालक मात्र तोच आहे.

Web Title: The scavengers started selling vegetables now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.