शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते मग शाळेची का नाही? (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:27 AM2021-04-12T04:27:11+5:302021-04-12T04:27:11+5:30
गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण ...
गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ११ पर्यतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ११ पर्यंतवीच्या १९२३२५ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही हे दुहेरी धोरण दिसून येत आहे.
जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७ तर मुली ७०८८ असे १४५४५ विद्यार्थी आहेत. वर्ग दुसरीत मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २०१७६ विद्यार्थी, चवथीत मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २०४०६ विद्यार्थी, पाचवीत मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९६६४ विद्यार्थी, सहावीत मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९४४० विद्यार्थी, सातवीत मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९६५० विद्यार्थी, आठवीत मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २०६०१ विद्यार्थी, नववीत १०७१५ मुले तर १००५७ मुली असे २०७७२ विद्यार्थी, अकरावीत ९००९ मुले तर ९५०० मुली असे १८ ५०९ विद्यार्थी असून अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे तर शाळेची परीक्षा का नाही असा सवाल उपिस्थत होत आहे.
------------------
पालक असे म्हणतात...
कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ११ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.
- अविनाश मेंढे, पालक, खातिया.
----------------
कोट
विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.
- सुनिता पाऊलझगडे, पालक, आसोली.
.......---------
परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात
सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.
- विरेंद्र कटरे, शिक्षक जि.प. शाळा, बलमाटोला
...
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
-अनिरूध्द मेश्राम, शिक्षक, जि.प. शाळा, दत्तोरा
.......
शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.
-सुरेश रहांगडाले, शिक्षक जि.प. शाळा करंजी
जिल्ह्यातील विद्यार्थी वर्ग विद्यार्थी संख्या
पहिली १४५६५
दुसरी १८५४२
तिसरी २०१७६
चौथी २०४०६
पाचवी १९६६४
सहावी १९४४०
सातवी १९६५०
आठवी २०६०१
नववी २०७७२
अकरावी १८५०९
.....
नवव्या वर्गात सर्वाधीक विद्यार्थी संख्या-२०७७२
.....
ही ढकलगाडी काय कामाची
एकही अभ्यास न करता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळा बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.