पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:08 PM2017-11-12T22:08:27+5:302017-11-12T22:08:37+5:30

जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

Scholarships eligible for all students | पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

Next
ठळक मुद्देबबलू कटरे : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागासवर्ग व वीजा-भज या प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे आवेदन आॅनलाईन प्रक्रियेद्वारा सादर करुन आॅनलाईन करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार विद्यार्थी-पालकांची आहे, असे निर्देश शासनाने निर्गमित केले. आॅनलाईन अर्ज सादर करण्याची क्लीष्ट प्रक्रिया, साईट नियमितपणे न चालणे, आॅनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र ग्रामीण भागात उपलब्ध नसणे, यापूर्वीच्या मागील तीन वर्षाच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्याना अद्याप न मिळणे या व अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी-पालकांत त्रासाला कंटाळून असहकार्याची भावना निर्माण झाला आहे. कदाचित शासनाला सुध्दा हेच हवे आहे, असे एकंदर लक्षात येते. यामुळे निरुत्साह निर्माण होऊन इमाव, अजा, अजमाती आणि इतर मागास समाजाचे विद्यार्थी पुढील शिष्यवृत्तीपासून म्हणजेच शिक्षणापासून सुध्दा वंचीत होणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळावा व कुणीही वंचित राहणार नाही यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, थकीत असलेली शिष्यवृत्ती व शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क तत्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना देण्यता आले.
निवेदन देताना कोषाध्यक्ष अमर वराडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमकर, ओबीसी महासंघाचे खेमेंद्र कटरे आणि उपाध्यक्ष कैलाश भेलावे, महासचिव शिशिर कटरे, बंटी पंचबुध्दे, राजेश कापसे, डॉ. संजीव रहांगडाले, सुनिल भोंगाडे, सुनिल रहांगडाले, सावन डोये, जितु पारधी, संतोष यादव, राहुल खोब्रागडे, रवि भांडारकर व अन्य उपस्थित होते.

Web Title: Scholarships eligible for all students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.