जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये कडकडीत बंद

By admin | Published: July 23, 2014 11:40 PM2014-07-23T23:40:21+5:302014-07-23T23:40:21+5:30

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी पुकारलेल्या शाळा, महाविद्यालय बंदला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आली.

Schools and colleges in the district are closed | जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये कडकडीत बंद

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये कडकडीत बंद

Next

अन्यायाविरूध्द एल्गार : ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर
गोंदिया : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी पुकारलेल्या शाळा, महाविद्यालय बंदला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकाळ पाळीच्या शाळेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रार्थना घेऊन त्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले.
राज्य शासनाने ओबिसींचे विविध प्रश्न सोडविण्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात ते प्रश्न सोडविले नाही. त्यामुळे इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ओबिसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेप्रमाणे सहा लाख करण्यात येईल अशा विधानसभेत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी, ५२ टक्के ओबिसींना ५२ टक्के आरक्षण द्यावे, विहार सरकारप्रमाणे शैक्षणिक भत्ता द्यावा, अ.जा.ज., भटक्या जाती, विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्गाप्रमाणे ओबिसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, आरक्षणाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्याला ३ वर्षाचा कारावास द्यावा किंवा ५० हजार रूपये दंड ठोठावा, वर्ग एक व दोनच्या सर्व मुलाखतीमध्ये ओबीसी अधिकारी प्रतिनिधी असावा, ओबिसी बांधवाना नाकारण्यात आलेले वनहक्क जमीनीचे पट्टे आदिवासी बांधवांप्रमाणे मंजूर करण्यात आले अशा विविध मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या.
ओबीसी संघर्ष कृती समितीने सर्व शाळा महाविद्यालय बंद पाडून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. सदर निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ओबीसी कृती संघर्ष समितीचे बी.एम.करमकर, गुरूदास येडेवार, राजेश नागरीकर, कैलास भेलावे, बबलू कटरे, धन्नालाल नागरिकर, मनोज मेंढे, गुड्डू बिसेन, दुर्गा तिराले, योगेश पटले, दुर्गेश रहांगडाले, अमर वऱ्हाडे, अनिल डोंगरवार, संतोष खोब्रागडे, राजू ठकरेले, चेतन तुरकर, सावन बहेकार, सुनील पटले, लिलाधर पाथोडे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबींसी बांधवांचा समावेश होता.
आमगाव तालुक्यात स्वयंस्फू र्तपणे बंद
आमगाव : तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत १०० टक्के बंद पाळून शासनाविरुद्ध बंद यशस्वी केला.
ओबीसी कृती समितीने तालुक्यात यशवंत मानकर यांच्या नेतृत्वात बंद पुकारला होता. बंदमध्ये सहभाग मिळविण्यासाठी राजीव फुंडे, निलेश दमाहे, कमलेश चुटे, निखील कोसरकर, सुरेश बोपचे, राजेश मानकर, राकेश शेंडे, आशिष मेश्राम, राहुल चुटे, हर्षल मानकर यांनी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांना सहभागी केले. तालुका कृती समितीने तहसीलदार राजीव शक्करवार यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे सावन कटरे, मुरलीधर करंडे, ज्योती खोटेले, लिला कठाणे, कृष्णा चुटे, राधाकिसन चुटे, हरिष ब्राम्हणकर, उत्तम नंदेश्वर, विनायक येडेवार, प्रफुल्ल ठाकरे, कमल बहेकार, नरेश रहिले, दिपक जांगणे, रवी गौतम, पं.स. सदस्य हरिहर मानकर यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.
गोरेगावातही
१०० टक्के बंद
गोरेगाव : ओबीसीच्या विविध प्रश्नांसाठी एकसाथ आवाज उठवत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी बंद पाळला. कॉन्वेंटपासून तर सर्व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष कृती समिती तालुका गोरेगावच्या वतीने तहसीलदार डी.ए. सपाटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी नितीन कटरे, प्रा.संजीव रहांगडाले, संजय बारेवार, फाविंद्र धप्पडे, सोमेश रहांगडाले, लिकेश कावळे, प्रमोद तिरेले, बाबा बहेकार, जयप्रकाश कटरे, राजकुमार भैरम, कुमेश्वर कोहळे, शुभम लांजेवार, आकाश क्षिरसागर, दीपक लांजेवार, प्रदीप ठाकूर, शुभम टेंभुर्णेकर, अनिल राणे, राजकुमार पटले, योगेश चौधरी, पृथ्वीराज ठाकूर, किशोर पारधी, राहुल कटरे, प्रा.बी.बी. परशुरामकर, प्रा.जे.बी. बघेले, प्रा. विजय राणे, प्रा. जी.के. भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळा, कॉलेज बंदला प्रतिसाद
सालेकसा : ओबीसी संवर्गाच्या हक्क व अधिकाराच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सालेकसा तालुका ओबीसी कृति समितीतर्फे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळा-कॉलेज उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले.
सकाळपासून कृति समितीच्या सदस्यांनी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक वर्गाला संपर्क करुन शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले, अनेक शाळा व महाविद्यालयात कृती समितीचे सदस्य स्वत: जाऊन सुटीची घंटी वाजवली व बंद केले. तालुक्यातील राजकीय, सामाजिक, स्वयंसेवी आदी विविध संघटनांनी जाहीर समर्थन केले व तहसील कार्यालयात जावून तहसीलदार जी.एन. खापेकर यांना निवेदन पाठविले.
निवेदन देणाऱ्यांमध्ये गणेश भदाडे, नेपाल पटले, रमेश चुटे, सोहन क्षीरसागर, कांतीलाल येटरे, पप्पू राणे, अभिषेक चुटे, कृष्णा मेंढे, निलेश बोहरे, विनोद बहेकार, बृजभूषण बैस, निर्दोष साखरे, विजय मानकर, देवराम चुटे, मनिष शर्मा, यशवंत शेंडे, गुणवंत बिसेन, दिवकर सोनवाने, राजू दोनोडे, राजेंद्र बिसेन, योगेश रहांगडाले, पुरुषोत्तम क्षीरसागर, रवि खानोरकर, राजेश मानकर, मधु मेंढे, राजू फुंडे, नामदेव हटवार, गौरीशंकर बघेल, मधू हरिणखेडे, प्रविण पटले, गणेश फरकुंडे, कुलतार भाटीया आदींचा समावेश होता. (वार्ताहरांकडून)

Web Title: Schools and colleges in the district are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.