शाळा झाल्या किचनशेडयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:30 PM2018-12-17T21:30:43+5:302018-12-17T21:30:55+5:30
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जत होता. यातूनच, प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून शाळांत किचनशेड तयार करण्यात आले.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जत होता. यातूनच, प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून शाळांत किचनशेड तयार करण्यात आले. यातील काही शाळांना फायब्रोकेटेड रेडीमेड किचनशेड उपलब्ध करून देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील १०६५ पैकी १०६२ शाळांत किचनशेड असल्याची माहिती पुढे आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांत किचनशेड तयार करण्याची संकल्पना शिक्षण विभागाने आखली. परंतु किचनशेड करीता जिल्ह्यातील तीन शाळांमध्ये किचनशेड करीता जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी किचनशेड होऊ शकले नाही. जिल्ह्यातील १७३ शाळांमध्ये सिमेंट कॉँक्रीटचे किचनशेड आहेत. नवीन वस्ती शाळांत २०४ किचनशेड तयार करण्यात आले. तर ६८५ शाळांत फायब्रोकेटेड रेडीमेड किचनशेड देण्यात आले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम चिचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंदिया तालुक्यात ग्राम रावणवाडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व तिरोडा तालुक्यातील ग्राम बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या तीन शाळांत किचनशेड करीता जागा उपलब्ध नसल्यामुळे किचनशेड तयार होऊ शकले नाही. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यातील १०६५ पैकी १०६२ शाळांमध्ये किचन शेड उपलब्ध आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३७ पैकी १३६ शाळांत किचनशेड आहे. आमगाव तालुक्यातील ११६ शाळांमध्ये, देवरी १४४, गोंदिया १८८ पैकी १८७ शाळांत, गोरेगाव १०९ शाळांत, सालेकसा ११७ शाळांत, सडक-अर्जुनी ११५ शाळांत तर तिरोडा तालुक्यातील १३९ पैकी १३८ शाळांत किचनशेड आहेत.