वैज्ञानिकांनी घेतले आकाशगंगेची स्पष्ट छायाचित्र ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:37+5:302021-09-13T04:27:37+5:30
गोंदिया : खगोलशास्त्रज्ञांनी किमान एक दशकाच्या अथक परिश्रमानंतर आकाशगंगेची सगळ्यात विस्तृत व स्पष्ट इमेज जारी केली आहे. हे चित्र ...
गोंदिया : खगोलशास्त्रज्ञांनी किमान एक दशकाच्या अथक परिश्रमानंतर आकाशगंगेची सगळ्यात विस्तृत व स्पष्ट इमेज जारी केली आहे. हे चित्र एक रेडिओटेलिस्कोप लो फ्रिक्वेन्सी एरे म्हणजे लोफरच्या माध्यमातून घेण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.
लोफर अंदाजित ७०००० लहान ॲन्टिनांचा समूह असून तो ९ युरोपियन देशात पसरलेला आहे. याचे केंद्र नेदरलँड येथील एक्जलू येथे आहे. नुकतेच पुढे आलेले चित्र आश्चर्यजनक असून आकाशगंगा आणि कृष्णविवर यांच्याबाबत खूप काही स्पष्ट करते. युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरचे डाॅ. नील जॅक्सन यांच्या मतानुसार या उच्च विभेदन (हाय रेझुल्युशन) चित्रांना झूम केल्यानंतर आपण अधिक स्पष्ट पाहू शकतो. जेव्हा सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल (कृष्णविवर) रेडिओ जेट जारी करतात तेव्हा काय घडते हे यातून स्पष्ट होते. हे यापूर्वी एफएम रेडिओच्या आसपासच्या फ्रिक्वेंसीवर संभव नव्हते. या संशोधनामुळे भविष्यात आकाशगंगा व कृष्णविवरांच्या अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता येईल. विशेष म्हणजे या वैज्ञानिकांच्या समूहात श्रृती बडोले ही सामील असून, ती माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी आहे. तिने ब्रिटनमधील ससेक्स विद्यापीठातून अवकाश संशोधनात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर येथे अवकाश भौतिकीमध्ये पीएच.डी. करीत आहे. अवकाश भौतिकी क्षेत्रातील हा एक अभिनव व तांत्रिक प्रवास असून डरहम विद्यापीठाच्या डॉ. लेया मोराबीटो यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू आहे. यात श्रृती बडोले यांचा समावेश आहे.