लाच घेताना लिपिकाला अटक

By Admin | Published: May 25, 2017 12:49 AM2017-05-25T00:49:29+5:302017-05-25T00:49:29+5:30

१२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभाग गोंदियाकडून १३ विद्यार्थी पुरविण्यात आले होते.

The scrip was arrested when taking a bribe | लाच घेताना लिपिकाला अटक

लाच घेताना लिपिकाला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभाग गोंदियाकडून १३ विद्यार्थी पुरविण्यात आले होते. त्याचा मोबदला म्हणून ६५० रूपयाची लाच मागणाऱ्या लिपीकाला लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई २४ मे रोजी करण्यात आली.
तक्रारकर्ते हे संगणक इन्स्टीट्यूट चालक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महिला व बालकल्याण समिती राबवित असलेल्या योजना राबवायच्या आहेत. सन २०१५-२०१६ या आर्थीक वर्षात ग्रामीण भागातील ७ वी ते १२ वी पास मुलींना एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याकरीता महिला व बालकल्याण विभागाकडून १३ विद्यार्थी पुरविले होते. तेथील लिपीक प्रविण देशभ्रतार यांनी इन्स्टीट्यूट चालकाला १३ विद्यार्थी पुरविल्यांचा मोबदला म्हणून प्रत्येक विद्यार्थ्या मागे ५० रुपये प्रमाणे ६५० रुपयाची मागणी केली. सदर रक्कम प्रविण देशभ्रतार यांना देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोदिया येथे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी संबधात पडताळणी करून २४ मे रोजी सापळा कारवाईसाठी सापळा रचून जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला व बालकल्याण विभागातील कनिष्ठ सहायक प्रविण गुलजार देशभ्रतार याला ५०० रूपये लाच घेताना अटक करण्यात आली. ६५० रूपयाची मागणी असली तरी तडजोड करून ५०० रूपये देण्याचे ठरले होते. त्याच्या विरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कलम ७,१३(१) (ड) सह कलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पोलीस हवालदार शेंद्रे, प्रदीप तुळसकर, नायक पोलीस शिपाई रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, महिला शिपाई वंदना, चालक देवानंद मारबते व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: The scrip was arrested when taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.