जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:34 PM2018-09-27T23:34:01+5:302018-09-27T23:34:22+5:30

सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले. या रूग्णांची संख्या १८ वर गेल्याची स्वत: कबुली आरोग्य प्रशासन देत आहे. यापूर्वी ११ रूग्ण होते.

Scrub Tribes patients increase in the district | जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रुग्णांमध्ये वाढ

जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रुग्णांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्देरूग्णांची संख्या १८ वर : स्वाईन फ्लू पसरतोय पाय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले. या रूग्णांची संख्या १८ वर गेल्याची स्वत: कबुली आरोग्य प्रशासन देत आहे. यापूर्वी ११ रूग्ण होते. परंतु आणखी सात नवीन रूग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ स्वाईन फ्लू देखील पाय पसरत आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा तालुक्यात स्क्रब टायफसने पाय पसरले आहे. फक्त आमगाव तालुक्यातच या आजारचे रूग्ण आढळले नाही. ज्या गावात हे रूग्ण आढळले. त्या गावात साथरोग अधिकारी डॉ.बी.आर. पटले व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी त्या गावात भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना कश्या कराव्यात यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या खासगी डॉक्टर शासकीय आरोग्य यंत्रणेला देत नाही.
शासकीय यंत्रणा त्या खासगी डॉक्टरांकडील रूग्णांची माहिती बरोबर संकलित करीत नाही. आपले अपयश दिसू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या कमीत कमी दाखवित आहे. स्क्रब टायफसने दोघींचा मृत्यू झाला. तर १६ जण आजारी आहेत.
नवीन सात रूग्ण आढळले. त्यात सडक-अर्जुनी तालुक्यातील कन्हारपायली येथील गोपाल सोविंदा शिवणकर (४०) यांना १६ सप्टेंबर रोजी, तिरोडा तालुक्याच्या केसलवाडा येथील तुलाराम केशोराव तिडके (४०) यांना १९ सप्टेंबर रोजी, सडक-अर्जुनी तालुक्याच्या वृंदावनटोला येथील ओमप्रकाश मारोती शिवणकर (६०) यांना १९ सप्टेंबर रोजी, हनुमान नगर रिंगरोड गोंदिया येथील राजेंद्र डेमाजी खंगार (६६) यांना १९ सप्टेंबर रोजी, अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या हेटी येथील पंढरी तुलसीराम झोडे (६५) यांना १९ सप्टेंबर रोजी, देवरी तालुक्याच्या जेठभावडा येथील तुकाराम दशरू कोरेटी (५५) यांना २२ सप्टेंबर रोजी तर सालेकसा तालुक्याच्या कुलरभट्टी येथील रविंद्र गणराज नरोटी (२७) यांना २३ सप्टेंबर रोजी हा आजार असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले.
स्वाईन फ्ल्यूने एकाचा मृत्यू
स्क्रब टायफसनंतर आता गोंदिया जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत पसरत आहे. गोंदिया जिल्ह्यात तिघांना स्वाईन फ्लूूची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आमगाव तालुक्यात स्क्रब टायफस नसले तरी स्वाईन फ्लूने आमगाव तालुक्यातील पहिला बळी घेतला आहे. शालीनीताई निलमचंद्र नंदनवार (४२) रा. ठाणा असे स्वाईन फ्लूने मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिरोडाच्या शहीद मिश्रा वॉर्डातील हेमराज विश्राम भगत (५५) व काजल प्रशांत ठाकरे (२३) रा. सहकारनगर शहीद मिश्रा वॉर्ड गोंदिया यांना स्वाईन फ्लू झाल्याने २२ सप्टेंबर रोजी हेमराजला आॅरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे तर काजलला वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल करण्यात आले.

Web Title: Scrub Tribes patients increase in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य