जवरीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:27 AM2021-03-15T04:27:12+5:302021-03-15T04:27:12+5:30
३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी गावालगत असलेल्या वीटभट्ट्यांवर शनिवारी (दि.१३) भेट देऊन तपासणी करण्यात ...
३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी गावालगत असलेल्या वीटभट्ट्यांवर शनिवारी (दि.१३) भेट देऊन तपासणी करण्यात आली. त्यात जवरी गाव परिसरात एकही विद्यार्थी शाळाबाह्य किंवा स्थलांतर होऊन आलेले किंवा गेलेले आढळून आले नाही. हे सर्व्हेक्षण महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करून त्यात आढळलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वयानुरूप वर्गात त्वरित शाळेत नाव दाखल करून घेणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने चिरचाळबांध केंद्राचे केंद्रप्रमूख एन.जे.रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात गावातील कुटुंब सर्व्हेक्षण व परिसरातील विटभट्ट्यांवरील सर्व्हेक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात आली. भेटीच्या वेळी उच्चश्रेणी मुख्याध्यापक डी.टी.कावळे, प्रगणक ए.आर.राठोड, एम.के.हत्तीमारे, पदवीधर शिक्षक डी.एफ.डोये व अंगणवाडी सेविका किरण बंसोड, मंगला मेश्राम उपस्थित होत्या.