हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:30 PM2017-11-14T23:30:55+5:302017-11-14T23:31:20+5:30

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

The season has been delayed but the farmers have to get the paperwork | हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी पडून : सदस्याने वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र खरीप हंगाम संपत येत असताना शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
जिल्हा परिषदेने ताडपत्री खरेदी करीता सन २०१६-१७ ची अखर्चित तरतूद १५ लाख रुपये व सन २०१७-१८ मधील तरतूद १० लाख रुपये असे एकूण २५ लाख व शेतकºयांच्या हिस्सातील २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या ताडपत्री खरेदीला मंजूरी दिली. या मंजुरीला ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही या योजनेचे लाभार्थी कोण हे अद्याप पुढे आले नाही. असा मुद्दा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.
जि.प. सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात हा मुद्दा परशुरामकर यांनी लावून धरला. तेव्हा जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाºयांना कुठलेच उत्तर देता आले नाही. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात गंभीर दुष्काळ असल्याने मध्यम दुष्काळ हा शब्द वगळून पूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.
जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांनी पाठविलेला अहवाल शासनाने मान्य करावा अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर, रमेश अंबुले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी चर्चेत भाग घेऊन केली. सभापती पी.जी.कटरे यांनी सुद्धा सदस्याच्या मागणीचे समर्थन करुन त्या आशयाचे ठराव पारीत करण्यात आला. ताडपत्रीच्या व शेतकºयांच्या मुद्यावर जि.प. कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधीक्षक इंगळे हे सदस्यांचे समाधान करु शकले नाहीत. हंगाम संपत आला तरी शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप झाले नाही. अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर यांनीही कृषी विभागाला खडेबोल सुनावले.

१४१२ शेतकºयांचे अर्ज
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६६६ शेतकºयांना हंगामासाठी आयएसआय ट्रेडमार्कच्या ताडपंत्र्याचे शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे. आधी शेतकºयांना ताडपत्री खरेदी करायची असून खरेदीचे देयक जि.प.कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ताडपत्री द्याची आहे. परंतु आतापर्यंत १४१२ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. २५४ लाभार्थ्यांना आणखी ताडपत्रीसाठी लाभार्थी म्हणून घेता येईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: The season has been delayed but the farmers have to get the paperwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.