वर्षातील दुसरी आमसभा आज

By admin | Published: August 10, 2016 12:02 AM2016-08-10T00:02:07+5:302016-08-10T00:02:07+5:30

नगर परिषदेची या वर्षातील दुसरी आमसभा बुधवारी (दि.१०) आयोजीत करण्यात आली आहे. जानेवारी महिन्या नंतर ही आमसभा होत असून

Second AGM of the year today | वर्षातील दुसरी आमसभा आज

वर्षातील दुसरी आमसभा आज

Next

३५ विषयांवर होणार चर्चा : तिजोरीत भर व भार घालणारे विषय
गोंदिया : नगर परिषदेची या वर्षातील दुसरी आमसभा बुधवारी (दि.१०) आयोजीत करण्यात आली आहे. जानेवारी महिन्या नंतर ही आमसभा होत असून या सभेसाठी ३५ विषयांची सूची तयार करण्यात आली आहे. शहर विकासासाठी महत्वपूर्ण अशा विषयांवर या आमसभेत चर्चा होणार असतानाच दोन शाळांच्या समायोजनाचा गंभीर सुद्धा मांडण्यात येणार आहे.
दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियमानुसार बंधनकारक आहे. मात्र येथे तब्बल सहा महिन्यानंतर ही आमसभा घेतली जात आहे. त्यामुळे कित्येक विषय रेंगाळत चालले होते. परिणामी यंदाच्या आमसभेत ३५ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या ३५ विषयांत नगर परिषदेच्या तिजोरीत भर घालणारे काही विषय आहेत. तर तिजोरीवर भार देणारेही विषय दिसून येत आहेत. शहराचे सौंदर्यीकरण वाढविणारे विषय सुद्धा असून नगर परिषदेच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह लावणारे विषयसुद्धा मांडले जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांना कामावर घेणार
नगर परिषदेची स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि.९) पार पडली. २३ विषयांना घेऊन घेण्यात आलेल्या या सभेत कर विभागातील निलंबीत कर्मचारी जगदीश गाते, सुशिल बिसने व पप्पु नकाशे यांना कामावर परत घेण्याबाबत मंजुरी देण्यात आली. शहीद स्मारकाचे विद्युतीकरण, उड्डाणपुलांवरील पथदिव्यांची दुरूस्ती, शहरातील पथदिव्यांचे स्वीचबॉक्स बदलणे यासह अन्य विषयांना मंजूरी देण्यात आली.

हे विषय आहेत महत्वाचे
नवनिर्मित नाट्य मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन छत्रपतींची प्रतिमा स्थापीत करणे.
शहरातील सरकारी तलाव तसेच सिव्हील लाईन्स परिसरातील नाग तलावाचे सौंदर्यीकरण करणे.
लोधी समाजाच्या मागणीवरून केटीएस रूग्णालयात कुवर तिलकसिंह नागपूरे यांची प्रतिमा उभारणे.
नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन श्रेणीत कायम करण्यासाठी शासनस्तरावर शिफारस करणे.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचराकुंड्या खरेदीसाठी निविदा मंजूरी . तसेच १२० लोखंडी कंटेनर खरेदी करणे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंती निमित्त आहार वाटप करणे.

 

Web Title: Second AGM of the year today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.