आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत ३३२ बालकांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:06 PM2019-06-17T23:06:16+5:302019-06-17T23:06:28+5:30
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद केली. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यासाठी दुसरी सोडत शनिवारी १५ रोजी काढण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील ३३२ बालकांना संधी मिळाली आहे.
पहिल्या लॉटरीत या बालकांना प्रवेश मिळाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर एक एसएमएस पाठविण्यात आला. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. गोंदिया जिल्ह्याच्या १४१ शाळांमध्ये १०४३ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी २ हजार ७३१ अर्ज करण्यात आले होते. यातील ६०५ विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन प्रवेश घेतला. जिल्ह्यातील ७८.९८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्यामुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकात आला. त्यानंतर दुसºया सोडतीत आता ३३२ बालकांना मोफत प्रवेशाची संधी मिळाली आहे. या दुसºया सोडतीत निवड झालेल्या बालकांना २७ जूनच्या आत शाळेत प्रवेश घेणे आवश्यक आहे.
बºयाच पालकांनी अर्जामध्ये अपुरी माहिती भरल्याने त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पालकांना आरटीईतंर्गत प्रवेशापासून वंचित राहावे लागले.