प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य कायम
By admin | Published: July 10, 2015 01:45 AM2015-07-10T01:45:51+5:302015-07-10T01:45:51+5:30
शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली व गौैतमनगरातील प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.
प्रकरण पैकनटोली व गौतमनगरचे : कॅमेऱ्यांत कसलेही छायाचित्र नाही
गोंदिया : शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली व गौैतमनगरातील प्राण्यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा छडा लावण्यासाठी वनविभागाने घटनास्थळी कॅमेरे लावले. परंतु कॅमेऱ्यांत अद्यापही कसलेही छायाचित्रे आली नाही.
पैकनटोली निवासी प्रकाश रहांगडाले यांच्या तीन शेळ्या व दोन कोंबड्या रविवारी मृतावस्थेत आढळल्या होत्या. मृत शेळ्या व कोंबड्यांच्या मानेजवळ चावा घेतल्याचे चिन्ह होते. तिथून रक्त वाहत होते. याचप्रकारे कुंवरलाल नेवारे यांच्या घरीसुद्धा रविवारी पहाटे एक शेळी व पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. तर या घटनांच्या काही दिवसांपूर्वी गौतमनगर निवासी प्यारूभाई यांच्या घरातील कोंबड्या व सात शेळ््या मारण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात मात्र सहायक उपवन संरक्षक अश्वीन ठक्कर या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूसाठी वन्यप्राणी जबाबदार नसल्याचे सांगतात. त्यामुळे खरा आरोपी कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून ते दहशतीत आहेत.
तसेच वनविभागाकडून घटनास्थळी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेळ्या व कोंबड्यांना कोण मारतो याचे गुढ उघडे होईल, अशी भूमिका वनविभागाची होती. मात्र आठवडा लोटूनही या कॅमेऱ्यांमध्ये काहीही टिपले गेले नाही. त्यामुळे प्रकरण आणखी संशयास्पद होत आहे. (प्रतिनिधी)
घटना बंद, विविध चर्चांना उधाण
या प्रकरणात कुणी दहशत पसरवित असून तिघांना अटक करण्यात आल्याच्या चर्चा बुधवारी शहरात होत्या. परंतु घटना बंद झाल्या असून कुणालाही अटक करण्यात आले नसल्याचे ाा प्रकरणात कुणाला ताब्यात घेतले का असे पोलिसांना विचारणा केल्यावर त्यांनी घटना बंद झाल्या परंतु कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात आले नाही असे तपासी हवालदार रविकांत दराडे यांनी सांगितले. यासंदर्भात फिर्यादी भूपेंद्र रहांगडाले व त्यांच्या नातेवाईकांचे बयान घेण्यात आले. त्यात त्यांनी कुत्र्यासारखा दिसणारा लालसर रंगाचा जनावर होता असे सांगितले. परंतु कुणीती व्यक्ती ती जमीन हडपण्यासाठी दहशत पसरवित असावा अशा चर्चांना बुधवारी दिवसभर उधान आले होते.