सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:09 PM2017-12-18T23:09:16+5:302017-12-18T23:09:38+5:30

रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव एकनाथ ढवले यांनी मुंडीकोटा येथे तलाव खोलीकरण व अर्जुनी येथे ग्रामपंचायत अंतर्गत खैरबंदा जलाशयाच्या कालव्यातील गाळ काढणे, माती भरनाच्या कामांची रविवारी (दि.१७) पाहणी केली व कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला.

The Secretariat inspected the work of Rohini | सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी

सचिवांनी केली रोहयोच्या कामांची पाहणी

Next
ठळक मुद्देअर्जुनी व मुंडिकोटा येथे दिली भेट : मजुरांशी साधला संवाद

आॅनलाईन लोकमत
परसवाडा : रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव एकनाथ ढवले यांनी मुंडीकोटा येथे तलाव खोलीकरण व अर्जुनी येथे ग्रामपंचायत अंतर्गत खैरबंदा जलाशयाच्या कालव्यातील गाळ काढणे, माती भरनाच्या कामांची रविवारी (दि.१७) पाहणी केली व कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला. मजुरांना देण्यात येणाऱ्या सुविधा व मजुरी याबाबत विचारणा करून मजुरांसोबतही संवाद साधला.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीची कामे नसल्यामुळे शेतकरी व शेतमजूरांच्या हाताला काम नाही. अशात ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी होती व त्यानुसार ग्रामीण भागात रोहयोच्या कामांना सुरूवात होत आहे. रोहयोच्या कामांची पाहणी करण्यासाठी रोजगार हमी योजना व जलसंधारण सचिव ढवले रविवारी (दि.१७) ग्राम मुंडीकोटा व अर्जुनी येथे भेट दिली. खंडविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी पंचायत समिती स्तरावर ९० टक्के गावांत ग्रामपंचायत अंतर्गत कामे सुरु असून १०० दिवस मजूर काम करतील त्याप्रमाणे नियोजन असल्याचेही निदर्शनात आणून दिले.
याप्रसंगी ढवले यांनी, सिंचनाची कामे कमी प्रमाणात होत असून शेतकऱ्यांनी ती कामे करावी. तसेच विहिर, तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करावी असे सांगीतले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी, मजुरांना कामे करताना शेतातील वृक्ष कटाई करु नये. मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आहे. नाला सरळीकरण व तलावाची कामे मोठ्या प्रमाणात केली गेली पाहिजे, यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेणे व मजुरांनीही काम करणे गरजेचे असल्याचे मजुरांना समजावून सांगितले. या भेटीत सचिव ढवले यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार संजय रामटेके, उपविभागीय अधिकारी गंगाराम इळपाचे, उपविभागीय कृषी अधिकारी वनवार, जिल्हा कृषी अधीक्षक इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, विस्तार अधिकारी सुरेश निमजे, भायदे, पशुधन अधिकारी डॉ. प्रतांश गंगापारी, बालविकास प्रकल्प अधिकारी दुबे, चरडे, निखाडे, कनिष्ठ अभियंता रामदास बावनकर, कृषी सहायक सचिन लाडे, कमल सलामे, अजय खंडाईत, ग्रामसेवक भिलकर, सरपंच, सर्व सदस्य व जनप्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: The Secretariat inspected the work of Rohini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.