सुरक्षा रक्षकांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:27 AM2021-01-21T04:27:17+5:302021-01-21T04:27:17+5:30
गोंदिया : बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणापासून आतापर्यंत स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवेला आता १३ ...
गोंदिया : बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणापासून आतापर्यंत स्थानिक नागरिक या प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवेला आता १३ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला. या सुरक्षा रक्षकांची कोणतीही चूक नसताना विमानतळ प्रकल्पाने या सर्वांना अचानक कामावरून बंद केले. आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून बिरसी विमानतळासमोर सुरक्षा रक्षकांनी धरणे साखळी आंदोलन सुरू केले आहे. आज (बुधवारी) दुसरा दिवस असून या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे.
आम आदमी पार्टीचे पुरुषोत्तम मोदी, उमेश दमाहे, वंचित बहुजन आघाडीचे सतीश बन्साेड, राजू राहुलकर, माेगर्रा येथील सरपंच दिलीप मुंडेले यांनी या सुरक्षा रक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. आम्हाला कामावर पुन्हा घ्या, या मागणीसाठी विशाल सुरक्षा मजूर संघटनेचे अध्यक्ष अनिल भेंडारकर, सचिव पंकज वंजारी, उपाध्यक्ष बसंत मेश्राम, कार्यवाहक सतीश जगने, ऋषिमुनी पटले, लोकचंद मुंडेले, रामेश्वर चौधरी, गोविंद तावाडे, अनिल मंदरेले, मंगलेश मुंडेले, डिगंबर मेश्राम, सदाशिव पाथोडे यांनी आंदोलन सुरू केले आहे.