डीजीआर रद्द होऊनही सुरक्षा रक्षक रोजगारापासून वंचित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:28+5:302021-04-02T04:30:28+5:30

गोंदिया : आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी मागील अडीच महिन्यांपासून बिरसी परिसरातील स्थानिक सुरक्षा रक्षक आपल्या कुटुंबासह ...

Security guards deprived of employment despite DGR canceled () | डीजीआर रद्द होऊनही सुरक्षा रक्षक रोजगारापासून वंचित ()

डीजीआर रद्द होऊनही सुरक्षा रक्षक रोजगारापासून वंचित ()

Next

गोंदिया : आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी मागील अडीच महिन्यांपासून बिरसी परिसरातील स्थानिक सुरक्षा रक्षक आपल्या कुटुंबासह आंदोलनाला बसले आहेत. सुरक्षा रक्षकांना अडसर ठरत असलेला डीजीआर सुद्धा आत्ता रद्द झाला आहे. परंतु विमानतळ प्रशासनाने या सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत विमानतळ व जिल्हा प्रशासनाविरोधात रोष दिसून येत आहे.

डीजीआर हा स्थानिक सुरक्षा रक्षकांसाठी अडसर ठरत होता. त्याचाच आधार घेत विमानतळ प्रशासनाने स्थानिक सुरक्षा रक्षकांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. परंतु आता या प्रकल्पातून डीजीआर रद्द झाला आहे. त्यामुळे बंद केलेल्या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेऊन आंदोलन समाप्त करणे हे विमानतळ व जिल्हा प्रशासनाचे आद्य कर्तव्य होते. परंतु तसे न करता विमानतळ प्रशासनाने या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्यासाठी साफ मनाई केल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे. हा प्रकल्प विस्तारित होत असताना येथील स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता या आश्वासनाचा विसर पडल्याचे चित्र आहे. मागील अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू असून या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेऊन तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तसेच सुरक्षा रक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे लावून धरली आहे.

Web Title: Security guards deprived of employment despite DGR canceled ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.