पाच दिवसात शोधली ३४ शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:08+5:30

बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली आहे. सन २०१८-१९ मध्ये शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा व बालरक्षकांच्या सहकार्याने गोंदिया जिल्हा शाळाबाह्य मुक्त झालेला आहे.

Seek out 34 out of school children in five days | पाच दिवसात शोधली ३४ शाळाबाह्य मुले

पाच दिवसात शोधली ३४ शाळाबाह्य मुले

Next
ठळक मुद्देदगडखाणी, वीटभट्ट्यांवर घेतला शोध : जिल्ह्यातील ९२६ बालरक्षकांनी केले काम, शिक्षकांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रत्येक मुल शाळेत येतील टिकतील व शिकतील यादृष्टीने जिल्ह्यातील बालरक्षक काम करीत आहे. शाळाबाह्य बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली मदतीचे स्त्रोत व बालरक्षकासाठी असलेली सहाय्यक यंत्रणा यात महत्त्वाची भूमिका आहे. शाळाबाह्य मुले किंवा स्थलांतरीत बालकांच्या शोधासाठी १६ ते २० डिसेंबर या पाच दिवस बालरक्षक शिक्षकांद्वारे शोध मोहिम राबविण्यात आली यात ३४ शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली आहे. सन २०१८-१९ मध्ये शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा व बालरक्षकांच्या सहकार्याने गोंदिया जिल्हा शाळाबाह्य मुक्त झालेला आहे.
शाळाबाह्य बालकांमध्ये सतत ३० दिवस गैरहजर किंवा त्यापेक्षा अधिक काळ गैरहजर असलेले, अस्थायी कुटुंब स्थलांतर होऊन आलेले, शिक्षणात खंड पडलेले व कधीच शाळेच दाखल न झालेले शाळाबाह्य बालक आढळतात. प्रत्येक शाळेने आपल्या परिसराचा ३ किमी अंतरावर शाळाबाह्य बालकांचा शोध सातत्याने घेण्याबाबत यापूर्वीच निर्देश दिले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंत वीटभट्टया सुरू होतात.त्याठिकाणी शाळाबाह्य बालकांचा शोध घेणे गरजेचे आहे. सन २०१९-२० मध्ये शाळाबाह्य व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम वर्षातून तीन वेळा करण्याबाबत संदर्भात पत्र काढण्यात आले आहे. १९ ते २३ आॅगस्ट २०१९ ला या सत्रातील पहिली शोध मोहिम राबविली होती.त्यामध्ये १० शाळाबाह्य बालक आढळले होते.
दुसरा टप्पा १६ ते २० डिसेंबर २०१९ ला बालरक्षक शिक्षकांद्वारे शोधमोहिम राबविण्यात आला आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने व सर्व बालरक्षक शिक्षकांनी १६ ते २० डिसेंबर २०१९ या कालावधीत आपल्या क्षेत्रातील ३ किमी अंतरावर स्थलांतरीत शाळाबाह्य बालकांचा विटभट्टीतील तसेच दगडखाण येथे शोध मोहीम राबविली आहे. शोध मोहिमेदरम्यान आढळलेल्या शाळाबाह्य स्थलांतरीत बालकांचा शोध घेतांनाचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण झाल्यावर बालकरक्षकांमार्फत शाळाबाह्य स्थलांतरीत बालकांबाबत यशोगाथा, केस स्टडी, वृत्तपत्र कात्रण संकलीत केले.
यासाठी जिल्ह्यातील ९२६ बालरक्षकांनी काम केले. अर्जुनी-मोरगाव ८७, आमगाव २००, देवरी ५४, गोंदिया ११०, गोरेगाव १००, सालेकसा ३९, सडक-अर्जुनी ६९, तिरोडा २६७ बालरक्षकांनी शोध मोहीम राबविली.

या भागात घेतला शोध
एकही शाळाबाह्य बालक राहणार नाही याकरिता पाच दिवसीय सर्वेक्षणाचे सुक्ष्म नियोजन केले होते. १६ ते २० डिसेंबर २०१९ ला शाळाबाह्य मुलांच्या नोंदीचे प्रपत्रामध्ये शाळाबाह्य बालकांची माहिती बालरक्षकांनी भरली, दडगणखाणी वीटभट्टी काही कालावधी व्यवसाय करण्याकरिता वास्तव्यात असलेले भटके कुटुंब, बांधकाम, रेड लाईट एरिया व तत्सम तसेच भिक मागणारे कुुटुंब, रेल्वे स्टेशन,बस स्टॅन्ड इत्यादी ठिकाणी शोध घेण्यात आला आहे.

Web Title: Seek out 34 out of school children in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा