आरटीईसाठी ८५४ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:47 AM2021-05-05T04:47:32+5:302021-05-05T04:47:32+5:30
गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, ...
गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षांकरिता प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८७९ जागेसाठी ८५४ जणांची निवड करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील १४७ शाळांमध्ये ८७९ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधी दरम्यान जन्मलेली बालके ऑनलाईन प्रवेश नोंदणीकरिता पात्र राहणार आहेत. तालुक्याच्या गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहेत. आमगाव तालुक्यातील १२ शाळांत ८३ जागेसाठी १,२२७ अर्ज आले होते. त्यापैकी ८३ जणांची निवड करण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांत १०० जागेसाठी २३३ अर्ज आले होते. त्यापैकी ९३ जणांची निवड करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील १० शाळांत ४४ जागेसाठी २३२ अर्ज आले होते. त्यापैकी ४१ जणांची निवड करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यातील ५८ शाळांत ३४९ जागेसाठी ६,३२७ अर्ज आले होते. त्यापैकी ३४८ जणांची निवड करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील १६ शाळांत ८२९ जागेसाठी ४७१ अर्ज आले होते. त्यापैकी ७९ जणांची निवड करण्यात आली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांत ४१ जागेसाठी २२५ अर्ज आले होते. त्यापैकी ४० जणांची निवड करण्यात आली आहे. सालेकसा तालुक्यातील ७ शाळांत ४७ जागेसाठी ९४ अर्ज आले होते. त्यापैकी ४० जणांची निवड करण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील २१ शाळांत १३३ जागेसाठी १,०८४ अर्ज आले होते. त्यापैकी १३० जणांची निवड करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४७ शाळांत ८७९ जागेसाठी ९ हजार ८९३ अर्ज आले होते. त्यापैकी ८५४ जणांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी किती विद्यार्थ्यांचे नाव दाखल केले जाते. त्यानंतर जागा शिल्लक असल्यास प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे.