खर्रा शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बाल परिषदेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:25 AM2021-01-17T04:25:25+5:302021-01-17T04:25:25+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला जात आहे. बाल परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून तंबाखू, गुटखा, मावा, बिडी, ...

Selection of Kharra school students for Maharashtra Bal Parishad | खर्रा शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बाल परिषदेसाठी निवड

खर्रा शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बाल परिषदेसाठी निवड

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला जात आहे. बाल परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून तंबाखू, गुटखा, मावा, बिडी, सिगारेट, तपकीर यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावीपणे आपले मत मांडणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या भागातील बोलीभाषेत आपल्या परिसरातील लोकांना समजून देणाऱ्या, तंबाखूजन्य पदार्थबाबत परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या, आपल्या वर्गातील शाळेतील आपल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना जागृत करणाऱ्या आणि व्यसनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न मनात बाळगलेल्या ध्येयवेड्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रभावी असा समूह निर्माण करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या चळवळीला वेग बळ देण्याचे काम सलाम मुंबई फाउंडेशन कार्य करीत आहे. ऑनलाइन महाराष्ट्र बाल परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे, आपल्या ध्येयाप्रती जागृत करणे, ध्येय निश्चितीसाठी मार्गदर्शन करणे, स्वतःचे मत व्यक्त करणे निर्भीडपणे बोलण, व्यसनाधीनसारख्या समस्येबाबत जागृत करणे, व्यसनाधीनतेच्या नियंत्रणासाठी शक्य ते पर्याय पडताळून पाहणे, उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून वैचारिक दृष्टिकोन निर्माण करणे, या सर्व बाबी यांच्या माध्यमातून संवादांच्या माध्यमातून एकमेकांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने होत आहेत.

Web Title: Selection of Kharra school students for Maharashtra Bal Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.