बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 05:00 AM2022-01-08T05:00:00+5:302022-01-08T05:00:35+5:30

सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करू लागला. तेव्हा बचत गटाच्या इतर महिलांनी जेव्हा त्याच्या पत्नीला कर्जाची परतफेड करायला बोलायचे तेव्हा तो परतफेड न करता तुम्ही मला पैसे मागितले तर तुम्हाला मी जीवे मारून टाकीन अशा धमक्या सुद्धा देत होता.

Self-help group debt repayment cost her her life | बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले

बचत गटाचे कर्ज परत मागणे तिच्या जिवावर बेतले

Next

विजय मानकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा तालुक्यातील बिंझली येथे एका सिंगाडे विकणाऱ्या महिलेच्या गावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने खून केल्याची घटना २१ डिसेंबरला घडली. या घटनेचा आरोपी म्हणून सालेकसा पोलिसांनी बाबुलाल गोबरी ढेकवार (५२) याला अटक केली. त्यांनी पोलिसांजवळ खाेटी कहाणी रचली होती. आरोपीच्या पत्नीला बचत गटाचा कर्ज परत मागत असल्याने आरोपीने क्रोधित होऊन शिंगाडे विकणाऱ्या महिलेचा खून केल्याची बाब पुढे आली आहे. 
बिंझली येथील महिलांनी एकत्रित येऊन महिला बचत गट तयार केले होते. एखादा स्वयंरोजगार सुरु करावा म्हणून बचत गटाच्या माध्यमातून बँकेतून कर्ज काढले. त्यापैकी कर्जाची काही रकमेची उचल आरोपी बाबूलाल ढेकवार याच्या पत्नीनेही केली होती. परंतु दिलेल्या मुदतीत तिने कर्जाची रक्कम परत केली नाही. 
सिंगाडे विकणारी महिला इंद्रकला गुलाब दूधबर्वे ही बचत गटाची सचिव म्हणून काम पाहत होती. सचिव या नात्याने इंद्रकला दूधबर्वे आणि बचत गटातील अध्यक्ष व इतर महिलांनीसुद्धा तिला कर्जाची परतफेड करण्यासाठी बोलले परंतु गुंड प्रवृत्तीच्या बाबुलाल ढेकवारवार हा कर्जाची रक्कम खाऊन बसला आणि परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा तो रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करू लागला. तेव्हा बचत गटाच्या इतर महिलांनी जेव्हा त्याच्या पत्नीला कर्जाची परतफेड करायला बोलायचे तेव्हा तो परतफेड न करता तुम्ही मला पैसे मागितले तर तुम्हाला मी जीवे मारून टाकीन अशा धमक्या सुद्धा देत होता. जो कोणी माझ्या वाटेवर येईल त्याला सोडणार नाही असा इशारासुद्धा दिला होता. 
बिंझली गावात कहार समाजाचे दहा-बारा कुटुंब वास्तव्यात असून त्यांनी गावातील एका तलावाच्या पायथ्याशी आपली वस्ती बसवली आहे. 
त्या नजीक असलेल्या बोडीत दरवर्षी शिंगाड्याची शेती करून आपल्या मूलभूत गरजा भागविण्याच्या प्रयत्न करता. यापैकी गुलाब दूधबर्वे यांनी गावातील शाळेच्या जवळ दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपला निवास थाटला. शिंगाडे विकणे हा त्यांच्या पारंपरिक व्यवसाय असून दरवर्षी तीन ते चार महिने शिंगाडे विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. 

आरोपीला फाशीची शिक्षा द्या 
- संशयित आरोपी बाबूलाल ढेकवार याला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर बाबूलाल ढेकवार याचे बयाण घेण्यात आले, तेव्हा त्याने एक खोटी कहाणी रचली. यामुळे कुटुंबीयांना बदनामीला सामोरे जावे लागले. या घटनेमागे नेमके कारण काय असावे, याच्या मुळापर्यंत जाण्याचे काम ‘लोकमत’ने केले. लोकमत प्रतिनिधीने पीडित परिवाराची भेट घेऊन गावातील अनेक लोकांशीसुद्धा चर्चा केली तेव्हा वेगळेच कारण पुढे आले. आरोपीने पोलिसांना खोटे बयाण दिल्याची बाब पुढे आली. गावकऱ्यांनी महिलेची बाजू घेत त्या नराधमाला फाशी , असेच मत व्यक्त केले.

 निवडणुकीच्या दिवशी साधला नेम 
- २१ डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा दिवस होता. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी गावाच्या जवळपास सिंगाडे विकून घरी परत येण्याच्या निर्णय घेतला. त्या दिवशी पती- पत्नी शिंगाडे विकायला सोबत न जाता पती दुसऱ्या गावात गेला आणि पत्नी जवळच्या पिपरटोला या गावी शिंगाडे विकायला गेली. तिच्या बत्तीस वर्षांच्या मुलाने पुलावरील मार्गाने नदीच्या पलीकडे सिंगाडे पोहोचवून दिले आणि इंद्रकला नाला ओलांडून गेली. निवडणुकीचे वातावरण असल्याने मुलगा घरी परत आला. गावात मतदान कार्यक्रम सुरू असताना बाहेर रस्त्यावर शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेत बाबूलाल ढेकवार याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिंगाडे विकून घरी परत येत असलेल्या महिलेला आधी तिच्या जवळच्या शिंगाडे कापण्याच्या कोयत्याने वार केला. नंतर डोक्याला दगडाने मारून खून केला. 

 

Web Title: Self-help group debt repayment cost her her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.