लसीचा वेळेत पुरवठा न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना फटका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:29 AM2021-04-01T04:29:54+5:302021-04-01T04:29:54+5:30

गोंदिया शहरात केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात कोरोना लसीकरण केेले जात आहे. शहरातील नागरिकांसाठी हे दोन्ही केंद्र सोयीचे असल्याने या ...

Senior citizens hit due to untimely supply of vaccine () | लसीचा वेळेत पुरवठा न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना फटका ()

लसीचा वेळेत पुरवठा न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना फटका ()

Next

गोंदिया शहरात केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात कोरोना लसीकरण केेले जात आहे. शहरातील नागरिकांसाठी हे दोन्ही केंद्र सोयीचे असल्याने या दोन्ही केंद्रावर दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी येतात. सकाळपासूनच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होते. बुधवारी सुध्दा ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील नागरिक या दोन्ही रुग्णालयात लसीकरणासाठी आले होते. मात्र दुपारी १ वाजेपर्यंत या दोन्ही रुग्णालयांना जिल्हा आरोग्य विभागांकडून लसीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागले. बीजीडब्ल्यू रुग्णालयात केवळ ३० लस उपलब्ध होत्या त्यामुळे ३० नागरिकांना लसीकरण करुन उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी बोलविण्यात आले. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच आल्या पावली परत जावे लागले.

..............

नगरसेवकांनी केली तक्रार

कोरोना लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नगरसेवक करीत आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचविण्याचे शहरातील नगरसेवक करीत आहे. पण बुधवारी केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात लसीकरणासाठी आणलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन ते चार बसून देखील लस न मिळाल्याने नगरसेवक बंटी पंचबुध्दे यांनी यावर संताप व्यक्त केला. तसेच याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.

Web Title: Senior citizens hit due to untimely supply of vaccine ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.