प्रयोगशाळेत पाठविले २०५४ रासायनिक व जैविक नमुने

By admin | Published: May 23, 2016 01:40 AM2016-05-23T01:40:45+5:302016-05-23T01:40:45+5:30

आंगणवाडीतील बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी जलस्त्रोतातून २०५४ रासायनिक व जैविक नमुने घेण्यात आले.

Sent to the laboratory 2054 Chemical and biological samples | प्रयोगशाळेत पाठविले २०५४ रासायनिक व जैविक नमुने

प्रयोगशाळेत पाठविले २०५४ रासायनिक व जैविक नमुने

Next

गोंदिया : आंगणवाडीतील बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी जलस्त्रोतातून २०५४ रासायनिक व जैविक नमुने घेण्यात आले. उर्वरीत उद्दीट्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील १ हजार ६७९ आंगणवाड्यांतील पाण्याच्या स्त्रोताचे रासायनिक व जैविक नमुने घेण्याचा उपक्रम जिला परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सुरू करण्यात आला. यात उपक्रमांतर्गत ३ हजार ३५८ नमुने घ्यायचे होते. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी २९ एप्रिल ते १२ मे हा काळ ठरविण्यात आला होता. सर्व तालुक्यांसाठी वेगवेगळ्या तारखा ठरविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद च्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींच्या खंड विकास अधिकाऱ्यांना आंगणवाडीतील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासण्याचे निर्देश देण्यात आले होते.सर्व आंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करण्याचे काम अभियान म्हणून चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत गोरेगाव १९७, सडक-अर्जुनी १६५, देवरी २०४, आमगाव १७०, सालेकसा १७४, गोंदिया ३४८, तिरोडा १७४ व अर्जुनी-मोरगाव मधील २२२ आंगणवाड्यांमधील रासायनिक व जैविक असे दोन नमुने घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

अर्जुनी-मोरगाव येथून सर्वाधिक नमुने
पाण्याचे नमुने घेणे व त्यांना प्रयोगशाळेत पाठविण्याचे सर्वाधिक काम अर्जुनी-मोरगाव तालुक्याने केले आहे. या तालुक्यातील ४३० नमुने प्रयोगश्रायेत पाठविण्यात आले. यानंतर तिरोडा २६४, सालेकसा २३८, आमगाव २१२, देवरी २८०, गोंदिया ३५९ व गोरेगाव येथून १९६ नमुने पाठविण्यात आले आहे.
प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी
पाणी व स्वच्छता मिशन सेल द्वारे आंगणवाडीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आंगणवाडीच्या पाण्याची तपासणी करण्याची जबाबदारी आंगणवाडी प्रकल्प अधिकारी यांची आहे. नमुने पाठविण्याचे काम ग्राम पंचायतच्या माध्यमातून करायला हवे. पाणी व स्वच्छता मिशन सेलनुसार प्रशासनाद्वारे बालकांच्या आरोग्यासाठी आंगणवाडीतील पाण्याच्या स्त्रोतावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
नमूना अहवालाला लागेल उशीर
पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यांना प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहे.सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येईल. यानंतर आंगणवाडीतील पाण्याच्या स्त्रोतासंबधी असलेल्या स्थितीत माहिती मिळेल. परंतु प्रयोग शाळेतून त्या नमुन्यांचा अहवाल कधी येईल हे सांगता येत नाही.

Web Title: Sent to the laboratory 2054 Chemical and biological samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.